Best News Portal Development Company In India

नळदुर्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरीस गेलेला वागदरी येथील शेतकऱ्याचा मुद्देमाल मिळाला: नळदुर्ग पोलिसांच्या या कामगिरीबद्दल ग्रामस्थातून समाधान.

नळदुर्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरीस गेलेला वागदरी येथील शेतकऱ्यांचा मुद्देमाल मिळला : नळदुर्ग पोलीसांच्या या कामगिरी बदल ग्रामस्यातून समाधान
————————————————————-
नळदुर्ग (एस. के. गायकवाड):
नळदुर्ग पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील पत्र्याचे शेडच्या दरवाजाचे कुलूप तोडून शेडमध्ये नुकतच रास करून ठेवलेले तुरीचे सात ते आठ पाकीट व गॅस सिलेंडर भांडी संसार उपयोगी वस्तू त्याचप्रमाणे एका दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतातील म्हैस रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरटे मालवाहतूक पिकप मध्ये घेऊन चोरून नेत असल्याचे नळदुर्ग पोलीसांच्या लक्षात येताच त्यानी त्यांच्यावर पोलीस चौकशी पद्धतीनीने पोलीस निरिक्षक सचिन यादव यांच्या मार्ग दर्शनाखाली दिवसभर अंकूश ठेवून शेतकनऱ्याचा चौरीर गेलेल्या मुदेमाला सह माल वहातुक पिकप (टेम्पो )हस्तगत करून दोन आरोपीना गजा आड केले.
एका चित्रपटाला शोभेल असी ही घाटना असून नळुदुर्ग पोलीसांच्या या कामगिरी बदल ग्रामस्थातून समाधान व्यक्त केले जात आहे.
या बाबत माहिती असी की दि. ८ जानेवारी २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथील शेतकरी सौ.शिक्षाबाई रमेश जेटीथोर यांच्या वागदरी व गुजनूर शिव लगत असलेल्या शेतातील पत्र्याच्या शेडचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने शेडमध्ये नुकतच रास करून ठेवलेले तुरीचे सात-आठ गोणी व गॅस सिलेंडर,भांडे काही संसार उपयोगी.वस्तू चोरून नेले त्याच प्रमाणे वागदरी येथील शेतकरी श्री फत्तेसिंग ठाकूर यांच्या शेतात बांधलेली एक म्हैस पिकप (टेम्पो) मध्ये घालून नळदुर्ग मार्गे लातूरकडे जात असताना नळदुर्ग येथील गोलाई मध्ये नळदुर्ग पोलीस ठाण्याये बिट आमलदार एन.सी. चाबुकस्वार आपल्या पोलिसांचे गस्त पथका 2 रुट पोलीग गाडी सह थांबली होते. त्यांच्या लक्षात आले की सदर या पिकप टेम्पो मधून .चोरीचा माल जात असावा या अंदाजाने ती गाडी थांबवून चौकशी केली असता गाडीतील इसमानी व चालकांनी त्यांना सदर माल हा हंगरगा नळ तालुका तुळजापूर येथील पाहुण्याचा असून घरगुती सामान आहे ते आम्ही लातूरकडे घेऊन जात आहोत असे खोटे सांग’ली.संबंधित हंगरगा येथील इसमानाही फोन केला असता त्यांनीही तो माल आमचाच आहे.ते आमचे पाहुणे आहेत असे सांगितले तरीही संशयाची पाल पोलिसांच्या मनात चुक चुकत होते म्हणून त्यांनी सतर्कतेने त्या वाहनातील इसम व.चालक यांचेआधार कार्ड,फोन नंबर आणि गाडीच्या आर. सी. बुक चे फोटो काढून घेतले आणि त्यांना तंबी दिली की गरज पडली तर तुम्हाला नळदुर्ग पोलीस स्टेशनला यावं लागेल.. या अटीवर त्यांनी त्यांना रात्री सोडून दिले. सकाळी सातच्या दरम्यान नळदुर्ग पोलीस स्टेशनला शेतकऱ्याची तोंडी तक्रार गेली की आमच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेले तुरीचे पोते व एका शेतकऱ्याची म्हैस चोरीस गेली आहे.वाहनाच्या टायरच्या खुणा त्या शेतामध्ये आहेत अशी माहिती नळदुर्ग पोलीस स्टेशनला गेली असता पोलिसांनी तपासाचे सूत्रे त्या मालवाहतूक टेम्पोच्या च दिशेने वळवलीअसना त्यांनी आम्ही सध्या लातूरमध्ये आहोत असे सांगीतले असता नळदुर्ग पोलीसानी ताना मुद्दे मला सह परत नळदुर्गला येण्याची तंबी दिल्या वरून ते मुद्देमाला सगट नळदुर्ग पोलीस ठाणे येथे हजर झाले आणि त्यांनी चोरीची कबुली दिली असता नळदुर्ग पोलीस त्यांच्यावर गुन्हा दाखल करून सदर प्रकरणाचे सखोल चौकशी सुरू केली आहे.
या चोरीच्या पाठीमागील एखादा गुप्तहेर नेमका कोण हंगरगा येथील नातेवाईकांनी पोलिसांना खोटी माहिती का दिली वागदरीतील एखादा गुप्तहेर या चोराचा साथीदार आहे का आसी चौफेर चौकशी होऊन या चोरी मागेन मुख्य सूत्रधार व चोरटे आणि या चोरांना साथ असलेले त्यांचे साथीदार यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे. कारण यापूर्वीही त्याच शेतकऱ्याच्या शेड मधून सोयाबीन चीरीस गेले होते.त्याचप्रमाणे वागदरीतील माजी सरपंच ज्ञानेश्वर किसन पाटील यांच्या शेतातील पत्राच्या शेड मधून ३० पोते सोयाबीन व विजयकुमार पाटील यांची शेतात बांधलेली गाय,नुकतेच शरद पवार, बाळू पवार,रामचंद्र यादव यांच्या घरात घुसून रोख रक्कम व सोन्याची दागीने अज्ञात चोरट्याने चोरी केल्याच्या घटना वागदरी गावात व शिवारात घडलेल्या आहत.या चोरी प्रकरणात ही या चोरांचा संबध येतो का ? याचा तपास पोलीसानी करावा अशी मागणी ग्रामस्थातून होत असून.नळदुर्ग पोलीसानी केलेल्या या कामगीरी बद्दल सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india