नंदगाव जिल्हा परिषद गटातून सामाजिक कार्यकर्ते सिद्धू अण्णा कोरे यांनाच भाजपा कडून उमेदवारी द्यावी ग्रामस्थांची मागणी: प्रसंगी वर्गणीकरून सिद्धू अण्णा कोरे यांना विजयी करू हितचिंतक कार्यकर्त्यांचा निर्धार
—————————————————–
नळदुर्ग ( एस.के.गायकवाड ):
आयुष्यभर १० टक्के राजकारण आणि ९०% समाजकारण करणारे सामाजिक जाणीवेतून सर्वसामान्य जनतेच्या वेळप्रसंगी धावून जाणारे भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते नंदगाव तालुका तुळजापूर येथील सिद्धू अण्णा कोरे यांनाचं नंदगाव जिल्हा परिषद गटातून भाजपाकडून उमेदवारी द्यावी अशी मागणी ग्रामस्थातून होत असून वेळप्रसंगी सिद्धू अण्णा कोरे यांना वर्गणी करून विजय करू असा निर्धार या गटातील काही हितचिंतक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
सिद्धू अण्णा कोरे हे नंदगाव ग्रामपंचायत मध्ये अनेक वर्षापासून सरपंच उपसरपंच सदस्य म्हणून जनतेच्या सेवेत आहेत फक्त दहा टक्के राजकारण करून ९० टक्के समाजकारण करत आलेले आणि सध्या करीत असलेले आपल्या गावातीलच नव्हे तर परिसरातील ही एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीवर काही अडचण आली काही गंभीर प्रसंग ओडवला आणि ती वार्ता सिद्धू अण्णा कोरे यांच्या कानावर पडली तर ते धावून त्यांच्या पर्यंत जावून अडचणीत सापडलेल्या कुटुंबाची भेट घेतात त्यांना आपल्या परीने सहकार्य करण्याचा अत्यंत जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. ते पंचायत समिती तुळजापूरचे सभापती म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे शासन आणि प्रशासनातला त्यांच्या दांडगा अनुभव आहे.गाव विकास आराखड्यातील बारीक सारीक गोष्टीचा त्यांना अभ्यास आहे.अंतर्गत रस्ते,गटारी,पाणी, विज आदी सुमाताच्या जिव्हाळ्याच्या समस्या विषयी त्याना जाणिव असून मानवाच्या अत्यवश्यक गरजा कशा पूर्ण करता येईल यासाठी त्यांची सातत्याने धडपड असते.
तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राणाजगजीत सिंह पाटील यांचे अत्यंत निकटवर्तीय कार्यकर्ते म्हणून त्यांची परिसरामध्येच नव्हे तर जिल्ह्यात ओळख आहे. जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ वरिष्ठ युवा कार्यकर्ते सिद्धू अण्णा यांच्या कामाबद्दल अत्यंत समाधानी आहेत. एखाद्याला दवाखान्याची गरज असेल आजारी असेल किंवा अपघातामध्ये एखादा गंभीर जखमी झाला असेल आणि ते जर अण्णांच्या निदर्शना आले तर त्यांना आपला पूर्ण वेळ देऊन त्याच्या उपचार सुरू होईपर्यंत त्या रुग्नाना सहकार्य करतात. अनेक वेळा नंदगाव आणि परिसरातीलच नव्हे तर तुळजापूर तालुक्यातील गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना आमदार राणा दादा यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील त्यांच्या तेरणा हॉस्पिटलमध्ये नेऊन उपचार करून त्यांना पूर्णता आजारातून बरे करूनच गावाकडे घेऊन येण्यात सिद्धू अण्णा कोरे यांचा फार मोठा अखंड आहे.याची जाणीव नंदगाव व परिसरातील सर्व गावांना आहे.त्याच्या निगर्वी व निपक्षपाती स्वभावामुळे ते सर्वांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत तुळजापूर तालुक्यातून नांदगाव जिल्हा परिषद गटातून भाजपाने सिद्धू आणणा कोरे यानाचं उमेदवारी देऊन पूर्ण ताकतिनीशी विजयी करून जनतेची सेवा करण्याची संधी द्यावीअशी मागणी या गटातील सर्व गावातील ग्रामस्थातून होत असून त्यांच्या विजयासाठी जीवाचे रान करून प्रसंगी वर्गणी करून सिद्धू अण्णा कोरे यांना आम्ही विजयी करणार असा निर्धार या गटातील वागदरी, गुजनुर,खुदावाडी, दहिटणा,येडोळा, लोहगाव, नांदगाव,सिंदगाव,बोरगाव ( तु.), सलगरा, बोळेगाव आधी गावातील सिद्धू अण्णा कोरे हितचिंतक कार्यकर्त्यांनी केला असल्याचे समजते तरी नांदगाव गटातून भारतीय जनता पार्टीच्या वतीने सिद्धू अण्णा कोरे यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे.






