Best News Portal Development Company In India

विद्यार्थी घडवणाऱ्या गुरुजींचा सन्मान; केमवाडीमध्ये सेवापूर्ती समारंभ उत्साहात

विद्यार्थी घडविणाऱ्या गुरुजींचा सन्मान; केमवाडीमध्ये सेवापूर्ती समारंभ उत्साहात

तुळजापूर | ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर तालुक्यातील केमवाडी येथील मधुकरराव चव्हाण विद्यालय, केमवाडी येथील ज्येष्ठ शिक्षक विजय रघुनाथ चव्हाण यांच्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ व गुणवत्तापूर्ण सेवापूर्ती निमित्त भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्य वेचणाऱ्या शिक्षकाचा गौरव करताना उपस्थितांचे मनोगत भारावून गेले.इंग्रजी विषयाचे अध्यापन करताना चव्हाण यांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, भाषेची आवड व शिस्त निर्माण केली. अध्यापनाबरोबरच शालेय क्रीडा स्पर्धांमध्येही त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये पारितोषके मिळवून शाळेच्या नावलौकिकात भर घातली.
या समारंभास संस्थेचे उपाध्यक्ष ऋषिकेश मगर, संचालक मोहन भोसले,गणेश जळके, केमवाडीचे सरपंच गजेंद्र कोकरे, उपसरपंच अशांत फंड, मुख्याध्यापक रविकिरण खुणे, विजयकुमार नवले, धनराज बरबडे, मालोजी थेटे, राजकुमार नरवडे, बलभीम कांबळे, दिलीप गुरव, बाळासाहेब रोकडे, अजितराव चव्हाण, मुख्याध्यापिका प्रतिभा पवार तसेच सलगऱ्याच्या सरपंच सुनीता चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी शाळेतील शिक्षक, कर्मचारी, चव्हाण यांचे कुटुंबीय व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या सेवाभावी कार्याचा गौरव करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india