Best News Portal Development Company In India

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिम नगर नळदुर्ग येथे बाल आनंद मेळावा संपन्न

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भीम नगर नळदुर्ग येथे बाल आनंद मेळावा संपन्न. —————————————————
नळदुर्ग (एस.के. गायकवाड) :
तुळजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भीम नगर नळदुर्ग येथे मुख्याध्यापक एस.यु. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तर येथील सहशिक्षिका सुलक्षणा टिळक यांच्या पुढाकारातून शालेय विद्यार्थ्यांच्या बाल आनंदी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी शाळेतच विद्यार्थ्यांनी भरावला होता विविध खाद्यपदार्थांचा बाजार.
या आनंदी मेळाव्यास येथील पालक व शिक्षण प्रेमी नागरिकांनी भेट देऊन आपल्या चिमुकल्या शालेय विद्यार्थ्यांनी भरविलेल्या विविध खाद्यपदार्थाच्या बैठा बाजारात पदार्थ खरेदी करून खरेदी विक्रीचा आनंददायीअनुभव विद्यार्थ्याना दिला.
या बाल आनंदी मेळाव्याबाबत शाळेचे मुख्याध्यापक एस.यु.शेख यांना विचारले असता त्यांनी सांगितले की शालेय विद्यार्थ्यांच्या व्यवहारिक ज्ञानात भर पडावी त्यांना खरेदी विक्रीचा अनुभव घेता यावा शालेय पाठ्यपुस्तकच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त त्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावे या उद्देशाने या पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी शालेय विद्यार्थी पालक,शिक्षण प्रेमी नागरिक उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india