शेत वस्तीवर राहणाऱ्या वृध्द शेतकऱ्याच्या घरावर दरोडा घालणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव पोलिसांनी केले गजाआड
—————————————————–
नळदुर्ग (एस. के.गायकवाड):
धाराशिव जिल्ह्यातील उपळा शिवारात शेत वस्तीवर राहणाऱ्या एका वृद्ध शेतकऱ्यांच्या घरावर दरोडा टाकून घरात घुसून वृद्ध महिलेस मारहान करून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या ४ दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव पोलिसांनी गजाआड केले व त्यांच्याकडून यापूर्वी केलेल्या इतर सात आठ जबरी चोरीचा उलगड करून घेतला.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की दि.७ जानेवारी २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास मौजे उपळा तालुका जिल्हा धाराशिव येथिल शेत वस्तीत राहणाऱ्या वृद्ध महिला शेतकरी कविता ज्ञानदेव कसबे यांच्या घरावर चोरट्यानी दरोडा टाकून घरातील लोकांना मारहाण करून १६.२ ग्राम सोन्याची दागिने लंपास करून फरार झाले.सदर चोरी प्रकरणाची तक्रार धाराशिव येथील ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दाखल झाल्यावरून जिल्ह्य पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर मॅडम यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता त्यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की सदर चोरी प्रकरणातील आरोपी हे मोहा ता.कळंब येथील पारधी पिढीवर थांबले आहेत.अशी माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकाने दि.१०जानेवारी २०२६ रोजी आपला तपासाचा मोर्चा मोहा तालुका कळंब येथील पारधी पिढीकडे वळविला व पारधी पिढीवर छापा टाकून तेथील चार संशयित आरोपींना चोरीच्या मोटार सायकली सह ताब्यात घेतले आणि त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिल्यावरून त्यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर ०५ / २०२६ प्रमाने दरोडा, जबरी चोरी, मोटार सायकल चोरीचा गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला असता त्यांनी गोळेगाव तालुका वाशी अंतरवली तालुका भूम या ठिकाणीही दि.१७ / १२ /२०२५ रोजी जबरी चोरी केल्याचे व शिर्डी, जामखेड येथून मोटार सायकली चोरल्याचे कबूल केले.अशाप्रकारे स्थानिक गुन्हें शाखा पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण आठ गुणांचा उलगडा करून घेतला असून आरोपीची नावे पुढीलप्रमाणे आहेत अनिल उर्फ लल्ल्या बादल शिंदे,छगन श्रीपती काळे,बिबीशन उर्फ बबड्या दिलीप काळे,विजय उर्फ तुंबड्या अप्पा पवार सर्व राहणार मोहा तालुका कळम अशीआहेत.
सदर धाडसी कारवाई कामगिरी ही जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर मॅडम, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनी सुदर्शन कासार,पोहे.शौकत पठाण,जावेद काझी,प्रकाश औताड, फरहान पठाण, शोभा बांगर, रत्नदीप डोंगरे नवनाथ गुरव आदी पोलीस पथकाने बजावली आहे.पोलिसांच्या या धाडसी कामगिरीबद्दल ग्रामस्थातून समाधान व्यक्त केले जात आहे






