Best News Portal Development Company In India

दर्पण दिनानिमित्त तुळजापुरातील पत्रकारांचा भाजपचे इंद्रजीत साळुंखे परिवारातर्फे सन्मान करण्यात आला.

दर्पण दिनानिमित्त तुळजापुरातील पत्रकारांचा भाजपाचे इंद्रजित साळुंके परिवारातर्फे सन्मान

तुळजापूर | तुळजापूर प्रतिनिधी

दर्पण दिन मराठी पत्रकारिता दिनानिमित्त तुळजापूर शहरातील सन्माननीय पत्रकारांचा साळुंके परिवाराच्या वतीने माजी उपनगराध्यक्ष देवीदासराव साळुंके यांच्या शुभहस्ते गौरव करण्यात आला. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारितेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा छोटेखानी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
पत्रकारिता म्हणजे केवळ बातम्या संकलन करण्यापुरती मर्यादित नसून, माहितीचे विश्लेषण करून ती समाजासमोर अचूक, सत्यनिष्ठ व नैतिकतेच्या कसोटीवर सादर करण्याची जबाबदारी आहे. वर्तमानपत्र, दूरदर्शन, यूट्यूब चॅनेल तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, माहिती देणे व सुज्ञ निर्णय घेण्यास सक्षम करणे हे पत्रकारांचे महत्त्वाचे कार्य असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. पत्रकारिता ही समाजाचा आरसा असून, वस्तुनिष्ठ सत्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पत्रकार करीत असतात, असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले.या सन्मान सोहळ्यास तुळजापूरचे माजी उपनगराध्यक्ष देवीदासराव साळुंके, इंद्रजीत साळुंके, श्रीकृष्ण साळुंके, विशाल साळुंके, लक्ष्मण शिरसाठ, प्रसाद पानफुडे व सतीश दिवटे यांची उपस्थिती होती.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india