Best News Portal Development Company In India

आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नातून जळकोट आणि परिसरात ८८ लाख रुपये विकास निधी मंजूर; माझी जि .प. सदस्य गणेश दादा सोनटक्के यांची माहिती!

आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या प्रयत्नातून जळकोट आणि परिसरात ८८लाख रूपये विकास निधी मंजूर: माजी जि.प.सदस्य गणेश दादा सोनटक्के यांची माहिती
—————————————————–
जळकोट (अरुण लोखंडे ):
विकासाचे दुसरे नाव म्हणजे तुळजापूर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान लोकप्रिय आमदार राणाजगजीतसिंह पाटील असं म्हणटल्यास ते वावगे ठरणार नाही कारण तुळजापूर तालुक्यातील जळकोट,बोरमनतांडा,बालाजी नगर तांडा,जळकोट ते आष्टा (कासार )आदी ठिकाण विविध विकास कामाकरिता जवळपास ८८ लाख रुपयाचा निधी मंजूर करून घेतलेला आहे असी माहिती माजी जि.प. सदस्य तथा भाजपाचे नेते गणेश दादा सोनटक्के यांनी जळकोट येथील श्री केदारलिंग मंदिर सभागृहाच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी बोलताना दिली.
आमदार राणा दादा यांच्या प्रयत्नातून जळकोट येथील ग्रामदैवत श्री केदारलिंगेश्वर मंदिर सभागृहासाठी २५ लाख रुपये तर बोरमन तांडा येथे पथ दिवेसाठी दहा लाख रुपये त्याचप्रमाणे जळकोट येथील जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रातील शव विच्छेदन खोलीच्या दुरुस्तीसाठी दोन लाख रुपये तसेच भिमनगर जळकोट ते आष्टा (कासार)रोडच्या कामासाठी ५० लाख रुपये असा एकूण जळकोट व परिसरातील गावांच्या विकासकामासाठी ८८ लाख रुपयांचा निधी खेचून आणला असून जळकोट येथील श्री केदारलिंगेश्वर मंदिर सभागृहाचे भूमिपूजन नुकताच गणेश सोनटक्के यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते उपस्थित कार्यकर्त्यांना व ग्रामस्थांना माहिती देत असताना बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले की आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या रूपाने आपल्या तालुक्याला एक विकास पुरुष मिळाला असून त्यांच्या माध्यमातून भविष्यात आपण आपल्या परिसरातील मोठ्या प्रमाणात विकास कामे करून घ्यावयाचे आहेत.त्याकरिता प्रत्येकाने आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पाठीसी खंभिरपणे उभे राहणे गरजेचे आहे.
या वेळी श्री केदारलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री पटणे साहेब, श्री नळगे साहेब, नारायण पटणे नागनाथ मेंगशेट्टी तमन्नाप्पा माळगे, रेवण दरेकर,प्रदीप हत्ते, संतोष वाघमारे,संजय माने सदाशिव हसुरे, संजय अंगुले बालाजी पालमपल्ले,कल्याणी साखरे,अनिल छत्रे,विजय पिसे, प्रदीप आलुरे,तुकाराम कुंभार, रिपाइं (आठवले )चे तालुका अध्यक्ष अरुण लोखंडे,कृषी उत्पन्न बाजार समिती तुळजापूरचे चेअरमन ऍड. आशिष सोनटक्के,अविनाश डांगे,काशिनाथ पठणे सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच जळकोट ते अष्टा (कासार).नव्याने डांबरीकरण रोड चे भूमिपूजन त्याचप्रमाणे बोरमन तांडा व बालाजी नगर तांडा येथील पथदिव्याच्या कामाचे भूमिपूजन ही माजी जि.प.सदस्य गणेश सोनटक्के यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेतकरी पांडुरंग कदम संगमेश्वर धरणे,नागनाथ कदम श्री सावंत, राजा माने, जळकोट व आष्टा येथील शेतकरी बांधवासह तानाजी चव्हाण, शंकर चव्हाण,भीमराव राठोड, बाबू चव्हाण,प्रदीप जाधव,वसंत जाधव,वसंत चव्हाण,बंडू चव्हाण,किसन राठोड,वामन राठोड,महेश राठोड,आकाश राठोड,मोहन चव्हाण रेवू राठोड सह ग्रामस्थ उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india