Best News Portal Development Company In India

गंधोरा-कौटुंबिक वादातून मारहाणीचा प्रकार; नळदुर्ग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल!

प्रतिनिधी सागर चौघुले ; कौटुंबिक कारणास्तव गंधोरा येथे मारहाणीचा प्रकार नळदुर्ग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल.

नळदुर्ग पोलीस ठाणे :आरोपी नामे-रंगनाथ दामु देडे, साखरबाई दामु देडे, मनिषा अमर सिरसट, रेखा विलास झोंबाडे, सर्व रा.गंधोरा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.09.01.2026 रोजी 09.00 वा. सु. ते दि.10.01.2026 रोजी 08.30 वा. सु. गंधोरा येथे फिर्यादी नामे-पदमीनी विनोद देडे, वय 24 वर्षे, रा.गंधोरा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी कौटुंबिक वादाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले.फिर्यादीचे आईस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन आईवडीलांना पेट्रोल टाकुन जाळुन मारण्याची धमकी दिली. फिर्यादीचा मोबाईल जमीनीवर आपटून फोडून नुकसान केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-पदमीनी देडे यांनी दि.11.01.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे नळदुर्ग येथे भा.न्या.सं.कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india