मित्राच्या घरी चोरी करणाऱ्या मित्रांना स्थानिक गुन्हे शाखेने केले गजाआड : धाराशिव येथील घटना.
——————————————————-
नळदुर्ग एस.के.गायकवाड):
धाराशिव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव चे पोलीस निरीक्षक विनोद पवार यांचे आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक धाराशिव जिल्ह्यातील मालाविषयी गुन्हे उघडकिस आणणे कामी धाराशिव शहरात पेट्रोलिंग करत असताना गुन्हे शाखा पोलीस पथकास गुप्त बातमी मिळाली की पोलीस ठाणे धाराशिव शहर गु. र. न.५७०/ २०२५ कलम३३१(४) ३०५ (A) बीएनएस ह्या गुन्ह्यातिल आरोपी स्वप्निल सतिश जेटीथोर,श्वेत सुनील चिलवंत, निखिल किरण सोनवणे, तिघे राहणार धाराशिव यांनी केला आहे अशी माहिती मिळाल्याने पथकाने धाराशिव शहरात नमूद आरोपीचा शोध घेतला असता ते धाराशिव शहरात मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे नमूद गुन्ह्याच्या अनुसंगाने चौकशी केली असता त्याने सांगितले की सदर गुन्ह्यातील फिर्यादी शुद्धोधन गायकवाड यांनी यातील आरोपींना उसने पैसे देऊन त्याचे जास्त व्याज घेतले होते म्हणून आरोपीने संगणमत करून फिर्यादीच्या घरी कुरणे नगर येथे चोरी केली असल्याचे कबूल केले नमूद आरोपीचे ताब्यातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे एकूण ७९ हजार ७८० रुपये चा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शकाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद पवार यांच्या आदेशावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, पोलीस हवालदार नितीन जाधव,बबन जाधव, चालक पोलिस हवालदार मेहबूब अरब, रोहित दंडनाईक यांच्या पथकाने केली आहे.






