Best News Portal Development Company In India

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष व शिवसेना शिंदे पक्षाची बैठक उमरगा येथे संपन्न!

*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष व शिवसेना शिंदे पक्षाची बैठक उमरगा येथे संपन्न*
दिनांक, 18 .1 .2026 उमरगा येथे आर. पी. आय. आठवले पक्षाची व शिवसेना शिंदे गटा ची जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी संदर्भात बैठक संपन्न झाली सदरील बैठक मा. रवींद्र (दादा) गायकवाड सर यांच्या निवासस्थानी घेण्यात आली या बैठकीत मा. रवींद्र (दादा) गायकवाड सर जिल्हा संपर्कप्रमुख व माजी खासदार म्हणाले की आपली महायुती आहे तरी आपण महायुती संदर्भात चर्चा करून आपण सर्व मित्र पक्ष मिळून निवडणूक लढवण्याचे निर्णय घेणार आहोत तरी मी माझ्या वतीने आर .पी. आय. ला महायुतीत घेण्यास कटिबद्ध आहे तसेच यावेळी मा.राजाभाऊ ओव्हाळ साहेब महाराष्ट्र राज्य जॉईंट सेक्रेटरी व धाराशिव जिल्हाध्यक्ष मा .विद्यानंद (दादा )बनसोडे यांनी जिल्हा परिषद दोन जागा व पंचायत समितीच्या तीन आरक्षित जागा उमरगा व लोहारा तालुक्यात जागा सोडाव्यात असे लेखी स्वरूपात मागणी केली यावेळी पक्षाचे इच्छुक उमेदवार बैठकीस उपस्थित होते या बैठकीस प्रमुख उपस्थिती मा. शिंदे दाजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य मा.एस के चेले साहेब मराठवाडा कार्याध्यक्ष मा. आनंद जी पांडागळे साहेब मराठवाडा कार्यकारणी सदस्य तथा माजी सभापती मा. हरीश जी डावरे साहेब उमरगा तालुका अध्यक्ष मा .बाबासाहेब गायकवाड लोहारा तालुका अध्यक्ष मा. काकासाहेब भंडारे मा.दिलीप सुरवसे जिल्हा उपाध्यक्ष मा. बाबासाहेब बनसोडे जिल्हा उपाध्यक्ष मा. दगडू भोसले जिल्हा सचिव मा.दिगंबर कांबळे जिल्हा सचिव लोहारा तालुका कार्याध्यक्ष मा.गजेंद्र डावरे लोहारा तालुका उपाध्यक्ष मा बालाजी माटे मा.एस के गायकवाड व या बैठकीस उमरगा तालुक्यातील व लोहारा तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी मा.राजाभाऊ ओव्हाळ साहेब आणि मा.विद्यानंद बनसोडे यांनी शिवसेना शिंदे गटाचे नूतन नगराध्यक्ष मा.किरण गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india