Best News Portal Development Company In India

नूतन नगरसेवक प्रवीण गायकवाड यांचा नळदुर्ग येथे सत्कार!

नूतन नगरसेवक प्रवीण गायकवाड यांचा नळदुर्ग येथे सत्कार
——————————————————-
नळदुर्ग (प्रतिनिधी ):
लोकशाहीर डॉॅ.अण्णाभाऊ साठे नगर नळदुर्ग तालुका तुळजापूर येथील लहुजी शक्ती सेनेचे युवा कार्यकर्ते प्रवीण धनराज गायकवाड यांची नुकतच नळदुर्ग नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे नगर येथे जाऊन नळदुर्ग नगर परिषदेचे गटनेते तथा सामाजिक कार्यकर्ते मारुती खारवे, महिला व बालकल्याण समितीचे सदस्य सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार दयानंद काळुंके रिपब्लिकन पार्टी ऑफ इंदिया (आठवले ) पक्षाचे जिल्हा सचिव तथा पत्रकार एस.के. गायकवाड आदींनी त्यांचा यथोचित सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या
याप्रसंगी बोलताना एस.के. गायकवाड महाले की, नगरपरिषद स्थापनेपासून ते आज तागायत मातंग समाजाला नगर परिषदेमध्ये प्रतिनिधित्व मिळाले नव्हते परंतु लहुजी शक्ती सेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष शिवाजी गायकवाड यांच्या संघर्षमय लढातून सामाजिक चळवळ सुरू आहे त्यांच्या या संघर्षमय चळवळीचे आणि समाजाच्या एकजुटीचे फलित म्हणून आज प्रवीण गायकवाड यांना नळदुर्ग नगर परिषदेमध्ये स्वीकृत सदस्य म्हणून सभागृहात प्रवेश करण्याची संधी मिळाली आहे.ही एक फार मोठी अभिनंदन आणि प्रेरणादायी अशी बाब असून प्रवीण गायकवाड हे नगरपरिषदेमधील सर्वात तरुण नगरसेवक म्हणून ओळखले जातात. यावेळी लहुजी शक्ती सेनेचे नेते शिवाजी गायकवाड, जेष्ठ कार्यकर्ते धनराज गायकवाड सह युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india