अणदुर जिल्हा परिषद गटातून वंचित बहुजन आघाडीचे आर.एस. गायकवाड निवडणूक रिंगणात
————————————————–
नळदुर्ग (प्रतिनिधी):
धाराशिव जिल्ह्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत अणदूर जिल्हा परिषद गटातून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाअध्यक्ष आर.एस.गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने विरोधी पक्षा समोर एक मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.
आर. एस. गायकवाड हे मूळचे अणदुर तालुका तुळजापूर येथील रहिवासी असून ते आंबेडकरी चळवळीतील एक संघर्षशील कार्यकर्ते आहेत.समाजाच्या अनेक प्रश्नावर त्यांनी आतापर्यंत उपोषण आंदोलन करून सामान्यजणांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने संघर्ष करीत आलेले आहेत. ते श्रद्धेय ॲड.बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत आहेत.होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये त्यानी अणदूर जि.प. गटातून वंचित बहुजन आघाडी कडून आपली उमेदवारी दाखल केली असून त्यांच्या उमेदवारीमुळे विरोधी पक्षापुढे एक मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.सध्या वंचित बहुजन आघाडीचे वातावरण महाराष्ट्रभर बऱ्यापैकी आहे.आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीकडे आकर्षली जात आहेत त्यामुळे आर.एस.गायकवाड यांची उमेदवारी ही निश्चितच कार्यकर्त्यांना काम करण्याची एक संधी आहे.असे मानले जाते.
त्यांची उमेदवारी ही नेमकी कुणाच्या पत्त्यावर पडते की ते विजय खेचून आणतात हे निवडणूक निकाल नंतर कळेल.






