धाराशिव बस स्थानकात बसची तोडफोड करणाऱ्या आरोपींना 24 तासात अटक
तुळजापूर प्रतिनिधी; स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव पोलिसांची कारवाई धाराशिव बस स्थानकात जाऊन. बसला उपोषणाचे पोस्टर चिटकवून .शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संस्था अध्यक्षांच्या कार्यकर्त्यांनी बसला दगड मारत सामाजिक मालमत्तेचे नुकसान केले .आनंदनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवण्यात आला. सदरील गुन्ह्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव पोलिसांना समजताच पेट्रोलिंग दरम्यान तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींची कार कळंब येथे आहे .अशी माहिती मिळताच तात्काळ रवाना होऊन. आरोपी
१) साईनाथ सावंत २) गणेश सावंत ३) श्रावण उर्फ गजेंद्र शिंदे ४) अमोल भीमराव भोंग या आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली. व त्यांच्याकडील गुन्ह्यात वापरण्यात आलेली ओरा होंडा कंपनीची कार एम. एच. 25 ए .एस .५१४२ नंबरची गाडी एकूण ७, ५०,००० हजार रुपये किमतीची कार ताब्यात घेण्यात आली. आरोपींना विश्वासात घेऊन चौकशी केली असता. आमच्या संस्थेचे अध्यक्ष तांदुळवाडी कळंब येथे उपोषणास बसले असून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या गुन्ह्याची कबुली दिली. सदर आरोपींना आनंदनगर पोलीस ठाण्यात पुढील तपासासाठी हजर करण्यात आले.
सदरील कारवाई पोलीस निरीक्षक श्रीमती रितू खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना, त्यांच्या मार्गदर्शनाखाली. स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक श्री विनोद इज्जपवार, यांच्या देशावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस हवालदार अमोल निंबाळकर, अमोल चव्हाण, बळी शिंदे, हेड कॉन्स्टेबल शोभा बांगर, चालक पोलीस अंमलदार दहीहंडे यांच्या पथकाने केली.






