Best News Portal Development Company In India

बेकायदेशीर गांजा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल; अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स छत्रपती संभाजी नगर विभागाची कारवाई!

बेकायदेशीर गांजा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल : अमली पदार्थ विरोधी टास्कं फोर्स छत्रपती संभाजी नगर विभागाची कारवाई
——————————————————-
नळदुर्ग (एस. के. गायकवाड ) :
धाराशिव जिल्ह्यातील एका गावामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये गांजाची लागवड करून देखभाल व रखवाली करतान मिळून आल्याने अमली पदार्थ विरोधी टास्कं फोर्स छत्रपती संभाजी नगर कृती विभाग च्या पोलीसानी परंडा जिल्हा धाराशिव पोलीस ठाणे येथे संबधित शेतकऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की मौजे देवळाली ता.भूम जिल्हा धाराशिव येथिल शेतजमित मानवी मेंदूवर विपरीत परिणाम घडवून आणणाऱ्या गांजाच्या झाडाची अवैधरित्या लागवड लागवडकरण्यात आली आहे. त्यावरून अमली पदार्थ विरोधी टाक्स फोर्स छत्रपती संभाजी नगर कृती विभाग यांनी दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी मौजे देवळाली तालुका भूम जिल्हा धाराशिव येथे गोकुळदास रावसाहेब हावळे वय ५० वर्षे यांचे मौजे देवळाली शिवारातील शेत गट नंबर ४६२ मध्ये छापा कारवाई केली असता तेथे शेतजमिनीवर गांजा वनस्पती ची अवैधरित्या लागवड करून देखभाल व रखवाली करताना मिळवून आले आहे.
त्यानंतर सदर ठिकाणी कायदेशीर पंचनामा करून गांजाची एकूण लहान-मोठी 52 झाडे उपटून गट्टे बांधून वजन करून 16 किलो गांजाची झाडे किंमत 71 हजार रुपयांचे मिळून आल्याने जप्त करण्यात आले आहे. सदर प्रकरणात पोलीस ठाणे परंडा जिल्हा धाराशिव येथे अमली पदार्थ विरोधी टाक्स फोर्स संभाजीनगर कृती विभागाचे स.पो. उप नि. वाहेद मुल्ला यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक 43/2026 कलम 8 (क),20 (ब),11 (ब) एन डी पी एस कायदा 1985 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी गोकुळदास रावसाहेब हावळे वय 50 वर्षे राहणार देवळाली तालुका भूम जिल्हा धाराशिव यास अटक करण्यात आली आहे.
सदर कारवाई ही आमली पदार्थ विरोधी टाक्स फोर्सचे पोलीस महानिरीक्षक श्रीमती शारदा राऊत मॅडम,पोलीस अधीक्षक श्री अजित टिके साहेब,डीवाय एसपी गुलाबराव पाटील साहेब,सपोनि विजय जगदाळे साहेब, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी श्रीमती दिपाली पाटील मॅडम, के.डी. संपकाळ साहेब, सपोउपनि वाहेद मुल्ला,हनुमान पुरके, हवालदार शैला टेके, सुरेश राऊत, नगेश केंद्रे,निलेश सरपाळे,नितीन जाधव,रवींद्र साळवे,सुरज जोनवाल,ज्ञानेश्वर चव्हाण,आम्रपाली सूर्यवंशी यांनी केली आहे.
. युवा वर्ग नशेच्या आहारी जात असल्याने अशा प्रकारचे कोणतेही नसेचे गांजा,ड्रग्ज ,अमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे, लागवड करणारे गुन्हेगारावर कारवाई करण्यासाठी अमली पदार्थ विरोधी टाक्स फोर्स ची स्थापना केलेली आहे असून जनतेने अशा लोकांची माहिती देण्याबाबत या बाबत सुंदेश देण्यात येत आहे
.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india