वागदरी येथे जि.प.प्राथमिक शाळा सह विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न
—————————————————–
नळदुर्ग (एस. के.गायकवाड):
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने वागदरीत तालुका तुळजापूर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सह विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वागदरीच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिनानिमित्ताने शाळेचे मुख्याध्यापक बी.बी.सगर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महादेव वाघमारे,उपाध्यक्ष कोमल झेंडर, मुख्याध्यापक बी.बी. सगर, पोलीस पाटील बाबुराव बिराजदार,ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पाटील,सह उपस्थित सर्व ग्रामपंचायतचे सदस्य तंटामुक्त समितीचे सदस्य आधी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व ध्वज कट्याचे पूजन करून शाळेचे मुख्याध्यापक बी.बी.सगर यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी सामुदायिक रित्या राष्ट्रगीत,राज्य गीत व संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन शालेय विद्यार्थ्यांच्या कवायतेचे सादरीकरण आधी कार्यक्रम यावेळी करण्यात आले.
या प्रसंगी सहशिक्षक डी.बी.अनपट,एन.एन.काळे, टी.एम.लोहार अगणवाडी कार्यकर्ती पद्मीनबाई पवार, मदतनिस पार्वतीबाई बिराजदार सह ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या सख्येने उपस्थित होते.
. तसेच ग्रामपंचायत कार्यालय वागदरी तालुका तुळजापूरच्या प्रांगणात ग्रामपंचायतीच्या वतीने
प्रजासत्ताक दिना निमित्त राष्ट्रीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन येथील सर्व ग्रामपंचायत सदस्य व माजी तंटामुक्त अध्यक्ष तथा सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या हस्ते ध्वज कट्याचे व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्य प्रतिमेचे पूजन करून सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय ध्वजारोहण करण्यात आले.
या प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी सामुदायिक रित्या राष्ट्रगीत संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन राज्य गीताचे सादरीकरण व शालेय विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाच्या खेळाचे सादरीकरण केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पाटील अमोल पवार सुरेखाताई यादव मीनाक्षीताई बिराजदार मुक्ताबाई बिराजदार सह ग्रामस्थ महिला विद्यार्थी युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी उपसरपंच दत्ता सुरवसे यांनी केले.
त्या प्रमाणे येथील भीम नगर मध्ये पंचशील बुद्ध विहार समाज मंदिराच्या प्रांगणात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक बी.बी. सगर सेवानिवृत्त पोलीस हवालदार संदिपान वाघमारे ग्रा.प सदस्य ज्ञानेश्वर पाटील माजी सरपंच नागनाथ बिराजदार ग्रा. प. सदस्य सुरेखाताई यादव, मीनाक्षीताई बिराजदार,मुक्ताबाई बिराजदार,सीआरपी विद्याताई बिराजदार,आदी मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी सामुदायक रित्या संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले तर शालेय विद्यार्थ्यांनी राज्य गीताचे सादरीकरण केले याप्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.यावेळी चंद्रकांत वाघमारे,अनिल वाघमारे, सूर्यकांत वाघमारे, सहादेव वाघमारे,उज्वला वाघमारे, गीताबाई झेंडारे, कमळाबाई वाघमारे,शुष्मा वाघमारे विजयाबाई वाघमारे कोमल झेंडारे सह शाळेचे सर्व शिक्षक विद्यार्थी ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्र संत्रसंचलन रिपाइं (आठवले) चे धाराशिव जिल्हा सचिव तथा पत्रकार एस. के.गायकवाड यांनी केले.







