Best News Portal Development Company In India

नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तुळजापूर शहर शाखेच्या वतीने जाहीर निषेध; तुळजापूर शहराध्यक्ष वैजनाथ पांडागळे!

नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तुळजापूर शहर शाखेच्या वतीने जाहीर निषेध:: गुन्हा दाखल करण्याची रिपाइ ची मागणी
————————————————-
तुळजापूर प्रतिनिधी :-
. दिनांक २६ जानेवारी २ o२ ६ रोजी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री भाजपाचे गिरीश महाजन यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने केलेल्या भाषणामध्ये अनेक महापुरुषांची नावे घेतली परंतु जाणीवपूर्वक भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव त्यांनी घेतले नाही. हा प्रकार म्हणजे त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे त्यांनी घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आव्हान केला आहे.ही गोष्ट निषेधार्थ असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तुळजापूरच्या वतीने नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचा जाहीर निषेध करून त्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई करावी व यासंदर्भात लागलीच आवाज उठवणाऱ्या वन विभागाच्या कर्तव्य दक्ष महिला आधिकारी माधवी जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून त्यांच्यावर कसल्याही प्रकारची कारवाई न करता सोडून देण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाच्यावतीने लेखी निवेदनाद्वारे तुळजापूर पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे. या संदर्भात तुळजापूर पोलीस ठाणे येथे देण्यात आलेल्या निवेदनावर रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मस्के जिल्हा उपाध्यक्ष प्रताप कदम जिल्हा सहसचिव तानाजी उमाजी कदम तुळजापूर शहर अध्यक्ष वैजिनाथ पांडागळे युवा आघाडीचे कार्याध्यक्ष धम्मशील कदम ओबीसी सेल शहराध्यक्ष लहू घोडके महेश कदम संदीप कदम सह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india