Best News Portal Development Company In India

आपल्या समाजाच्या आणि गावच्या विकासासाठी वंचित बहुजन आघाडीच्या हक्काच्या उमेदवाराला विजयी करा; युवा नेते सुजित आंबेडकर यांचे जळकोट येथे मतदारांना आवाहन!

आपल्या समाजाच्या आणि गावच्या विकासासाठी वंचित बहुजन आघाडीच्या हक्काच्या उमेदवाराला विजयी करा :युवा नेते सुजित आंबेडकर यांचे मतदारांना आवाहन
—————————————————-
जळकोट (अरुण लोखंडे ):
जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका ह्या ग्रामीण भागाच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असून आपल्या ग्रामीण भागातील विकासाच्या दृष्टीने आपल्या समाजाच्या आणि पर्यायांना गावच्या विकासासाठी आपला हक्काचा माणूस वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी जळकोट ता. तुळजापूर येथे बोलताना केले.
. होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये तुळजापूर तालुक्यातील जळकोट गटांतर्गत येणाऱ्या जळकोट पंचायत समिती गणातुन निवडनूक लढविणारे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार परमेश्वर लोखंडे आणि नंदगाव गट अंतर्गत येणाऱ्या खुदावाडी पंचायत समिती गणातून निवडणूक लढवत असलेले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार परमेश्वर कांबळे यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी धावती भेट दिली असता जळकोट येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.प्रारंभी जळकोट भिम नगर येथे असलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
पुढे बोलताना ते म्हणाले की शेतकरी शेतमजुरांच्या न्याय हक्कासाठी शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळण्यासाठी आणि कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याच्या सुविधेसाठी वीज पाणी रस्ते यांच्या सुविधा करिता वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यांनाच मतदान करून प्रचंड मतांनी विजयी करावे.
या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य नितीन ढेपे तुळजापूर तालुका अध्यक्ष गोविंद भंडारे माजी जिल्हाध्यक्ष डॉ.चंद्रशेखर गायकवाड,सतीश माने, प्रकाश लोखंडे, सागर लोखंडे,प्रवीण मुखरे,प्रदीप लोखंडे, उमेदवार परमेश्वर लोखंडे,रोहित माने, यशवंत गायकवाड,अरुण माने, वामन लोखंडे,योगेश लोखंडे, मल्लिनाथ माने महिला कार्यकर्त्या वर्षा गायकवाड, राधिका लोखंडे,अशा लोखंडे, प्रज्ञा माने,साधना लोखंडे, हकार्यकर्ते समता सैनिक दलाचे जवान उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india