Best News Portal Development Company In India

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री आई तुळजाभवानी मातेचे सशुल्क देणगी दर्शन पास माघ पौर्णिमे निमित्ताने शनिवारी व रविवारी बंद राहतील; मंदिर संस्थान (व्यवस्थापक) तथा तहसीलदार माया माने यांच्याकडून जाहीर!

पौर्णिमेनिमित्त भाविकांची गर्दी लक्षात घेता बंद राहतील; सर्व पुजारी व भाविक-भक्तांनी नोंद घ्यावी!
– – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – –
तुळजापूर प्रतिनिधी ;-  महाराष्ट्राचे कुलदैवत  आई  तुळजाभवानी  मातेच्या दर्शनासाठी सर्वच प्रांतातून भाविक भक्त तुळजापूरला दर्शनासाठी येत असतात. त्यांना सुलभ दर्शन मिळावे व गर्दीचे योग्य नियोजन व्हावे यासाठी मंदिर देवस्थान समिती पुजारी आणि भाविक भक्त यांचा समतोल साधत भक्तांच्या सेवेसाठी वेळोवेळी योग्य ती पावले उचलत असते.
दि.३१/०१/२०२६ व दि.१/०२/२०२६ रोजी शनिवार व रविवार आहे. माघपौर्णिमेनिमित्त भाविकांची गर्दी
लक्षात घेता. आई तुळजाभवानीच्या भाविक भक्तांना विना त्रास सुरक्षित व लवकर दर्शन व्हावे म्हणून  सशुल्क
देणगी दर्शन पास (५००/₹) आणि
रेफरल देणगी पास (२००/₹) बंद राहतील. तसेच देणगी सशुल्क देणगी दर्शन पास रुपये (२००/₹) पास चालू राहून  त्यांना  प्रांगणातून  अभिषेक  हॉलमार्गे दर्शनासाठी सोडण्यात येईल.
याची पुजारी व भाविक भक्तांनी नोंद घ्यावी.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान (प्रशासन) तहसीलदार तथा व्यवस्थापक श्रीमती माया माने यांच्याकडून जाहीर करण्यात आले. तरी महाराष्ट्रातून आणि इतर सर्व भागातून व इतर राज्यातून येणाऱ्या तुळजाभवानी मातेच्या भाविक भक्तांनी याची नोंद घ्यावी व सुलभ दर्शनाचा लाभ घ्यावी.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india