Best News Portal Development Company In India

प्रशासनावर वचक असलेल्या नेतृत्वास महाराष्ट्र मुकला ; माजी आमदार जयंतराव जगताप!

*प्रशासनावर वचक असलेले नेतृत्वास महाराष्ट्र मुकला : माजी आमदार जयवंतराव जगताप :-*
अविनाश जोशी/करमाळा
अजितदादांच्या दुर्दैवी
निधनाची धक्कादायक वार्ता कळली व मनअत्यंत व्यथित झाले .अजित दादा व मी जवळपास समवयस्क . आमचे मैत्रीचे व अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध .आमचा राजकारणातील प्रवेश देखील एकाच वेळी झाला , मी१९९० साली विधानसभेवर व दादा १९९१ साली लोकसभेवर गेले .त्यावेळी पवार साहेबांचे नेतृत्वाखाली मी, जयंत पाटील, सुभाष कुल आदी तरूण मंडळी कार्यरत होतो .महाराष्ट्राचे सरकार असो ,राज्य सहकारी बँक असो अथवा सहकार क्षेत्र असो अजित दादांचा प्रचंड दरारा व प्रशासनावर वचक होता .कार्यकर्त्यांना ताकद देणारा अजित दादां सारखा नेता पुन्हा होणे नाही .मी दोन वेळेस आमदार असताना तसेच सोलापूर डीसीसी बँकेच्या निवडणुकीमध्ये व आदिनाथचा चेअरमन असताना शिखर बँकेचे माध्यमातून अजित दादांनी केलेली मोलाची मदत करमाळा तालुक्यातील जनता कधीही विसरणार नाही . पवार कुटुंबीयांच्या दुःखात मी व्यक्तीशः सहभागी आहे .मी करमाळा तालुक्याच्या व जगताप कुटुंबियांच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो .ईश्वर मृतात्म्यास चिरशांती व सद्गती देवो हीच प्रार्थना

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india