Best News Portal Development Company In India

ब्रेकिंग न्यूज :- जनावरे चोरट्यांना तामलवाडी पोलिसांनी घेतले ताब्यात!

जनावरे चोरट्याना तामलवाडी पोलीसानी घेतले ताब्यात
——————————————————
नळदुर्ग (एस. के. गायकवाड):
माहे डिसेंबर २o२५ मध्ये तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलीस ठाणे येथे येथे जनावरे (म्हैशी) चोरी गेल्याचा गुन्हा दाखल झाला होता.सदर गुन्ह्यांच्या संबधाने तपास केला असता तामलवाडी पोलीसाना ताणंत्रिक विश्लेषणावरून व गोपनीय बातमीदार यांच्या मदतीने माहिती मिळताच दोन संशयित इसमाना पकडून चौकशी केली असता त्यानी गुन्ह्यांची कबूली दिल्यावरून त्यांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलीस सुत्राकडून मिळालेली माहिती असी की माहे डिसेंबर २o२५ मध्ये तामलवाडी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या मौजे नांदुरी येथिल जनावरे चोरी गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यांच्या संबधाने धाराशिव जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक श्रीमती रितू खोखर मॅडम व अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक शफाकत आमना मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी तुळजापूर श्री निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तामलवाडी पोलीसानी तपास केला असता ताणंत्रिक विश्लेषणावरून व गोपनीय बातमीदारा मार्फत माहित मिळाल्यावरून दोन संशयीत इसमाना ताब्यात घेऊन त्यांना विश्वासात घेत सखोल चौकशी केली असता त्यानी नांदुरी येथून तिन म्हैसी चोरून नेल्याचे कबूल करून आपली नावे सागितली ती पुढील प्रमाणे १) अजिम निजाम सय्यद व २) निलेश नागनाथ तानवडे दोघे रा. सावरगाव ता. तुळजापूर असी सागितल्यावरून त्यांच्यावर तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आलेआहे.
त्यांच्या कडे अधिक चौकशी केली असता त्यानी तिन म्हैशी पैकी एक म्हैस लातूर येथिल सोहेल साजिद कुरेशी याना विकल्याचे सांगीतल्यावरून पोलिसानी सोहेल कुरेशी यांच्या कडून म्हैशीची विक्री किंमत ताब्यात घेतली व आरोपी अजिम निजाम सय्यद यांच्या कडून दोन म्हैशी ताब्यात घेतल्या.या प्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात तिघा जनांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात वापरण्यात आलेले वहान पोलीसनी ताब्यात घेतले आहे.
सदरील कामगिरी तामलवाडी पोसठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिकक्ष गोकुळ ठाकूर, सपोउनि प्रदिप टेकाळे, पोह.१९८तोगी, १५३१ काझी,१५२३सुरज नरवडे,३११गोपाळ सलगर,१५९९ गायकवाड,५३६ शेख,नितीन भोसले आदीनी पार पाडली.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india