Best News Portal Development Company In India

करमाळा तालुका पत्रकार संघाच्या( सक्रिय )अध्यक्षपदी शितलकुमार मोटे: नूतन कार्यकारणी जाहीर! अविनाश जोशी/ करमाळा

करमाळा तालुका पत्रकार संघाच्या (सक्रिय) अध्यक्षपदी शितलकुमार मोटे; नुतन कार्यकारिणी जाहीर
अविनाश जोशी/करमाळा
करमाळा तालुक्यातील पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी अग्रेसर असलेल्या ‘करमाळा तालुका पत्रकार संघ (सक्रिय)’ ची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. या निवडीत अनुभवी आणि अभ्यासू पत्रकारांचा समावेश करून सर्वसमावेशक टीम तयार करण्यात आली असून, अध्यक्षपदी शितलकुमार मोटे यांची तर उपाध्यक्षपदी प्रफुल्ल दामोदरे यांची निवड करण्यात आली आहे.

अशी आहे नवीन कार्यकारिणी:

ज्येष्ठ सल्लागार व मार्गदर्शक म्हणून ॲड. डॉ. बाबुरावजी हिरडे, जयंत दळवी, आलिम शेख, अशपाक सय्यद आणि किशोरकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ कार्य करणार आहे.

कार्याध्यक्ष: सिद्धार्थ वाघमारे

प्रवक्ते: आण्णासाहेब काळे

सचिव: ॲड. विशाल घोलप

सह सचिव: ॲड. सचिन

प्रसिद्धी प्रमुख: राजाराम माने

संघटक: शेखर स्वामी

संपर्क प्रमुख: नाना पठाडे, संजय चौगुले

कार्यकारिणी सदस्य: या संघात विशाल परदेशी, राजेश गायकवाड, उमेश पवळ, गणेश जगताप, अंगद भांडवलकर, हर्षवर्धन गाडे, गजेंद्र पोळ, सुनील भोसले, विजय निकत, जयंत कोष्टी, धर्मराज दळवे, प्रशांत भोसले, प्रवीण अवचर, गौरव मोरे, सुयोग झोळ, अतुल बोकन, हरिभाऊ हिरडे, दस्तगीर मुजावर, नंदकुमार वलटे, संजय जाधव, बाळासाहेब सरडे, धनंजय निर्मळ आणि रणजीत शिंदे यांचा समावेश आहे.
कृपया चैकटीत घेणे——
पत्रकारांच्या न्याय्य हक्कासाठी कटिबद्ध : शितलकुमार मोटे (अध्यक्ष)
निवडीनंतर बोलताना नूतन अध्यक्ष शितलकुमार मोटे म्हणाले की, “आजच्या काळात पत्रकारांसमोर अनेक आव्हाने आहेत. ग्रामीण भागातील पत्रकारांना संरक्षण मिळवून देणे आणि त्यांच्या कौटुंबिक व सामाजिक अडीअडचणीत संघ खंबीरपणे पाठीशी उभा राहील. सर्वांना सोबत घेऊन संघटनेचे कार्य अधिक विस्तारण्याचा आमचा मानस आहे.”
कृपया चैकटीत घेणे——
नव्या जोमाने सामाजिक प्रश्न मांडणार : प्रफुल्ल दामोदरे (उपाध्यक्ष)
उपाध्यक्ष प्रफुल्ल दामोदरे यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, “पत्रकारिता हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. करमाळा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी हा संघ ‘सक्रिय’ भूमिका बजावेल. तरुण आणि अनुभवी पत्रकारांच्या या फळीमुळे तालुक्यात नवीन वैचारिक चळवळ उभी राहील.”

या निवडीचे करमाळा तालुक्यातील राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत केले असून नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india