गावाचा पायाभुतं विकासासाठी मायबाप मतदार बदु भगिनींनो मला सधी द्या : गणेश बिराजदार
—————————————————
नळदुर्ग (एस.के.गायकवाड ):
मराठी माणसाची अस्मिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय राज साहेब ठाकरे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली मी तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी पंचायत समिती गणातून निवडणूक लढवीत असून मायबाप मतदार बंधू भगिनींनी मला गावाच्या पायाभूत विकासासाठी आणि आपली प्रामाणिकपणे सेवा करण्याकरिता रेल्वे इंजिन या चिन्ह समोरील बटन दाबून मला विजय करून काम करण्याची संधी द्यावी असे कळकळीची विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तरुण आणि तडफदार उमेदवार गणेश बालाजी बिराजदार यांनी वागदरी येथे आयोजित कॉर्नर सभेत बोलताना केले.
तुळजापूर तालुक्यातील नंदगाव जिल्हा परिषद गट अंतर्गत येणाऱ्या खुदावाडी पंचायत समिती गणातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले सर्वात तरुण युवा कार्यकर्ते गणेश बिराजदार यांच्या प्रचारार्थ वागदरी येथे कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी ग्रामदैवत श्री संत भगवान सिंग महाराज श्री हनुमान मंदिर व श्री मल्लिकार्जुन महादेव मंदिर यांचे दर्शन घेऊन छत्रपती राजे संभाजी महाराज व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पुष्पहार घालून अभिवादन करून गावात पदयात्रा करण्यात आली आणि यानंतर मुख्य चौकात कॉर्नर सभा झाली यावेळी उमेदवार गणेश बिराजदार मतदारांना संवाद साधताना बोलत होते.या प्रसंगी गावातील ग्रामस्थ महिला युवा कार्यकर्ते उपस्थित होते.






