Best News Portal Development Company In India

खुदावाडी पंचायत समिती गणनातून विजयाची तुतारी वाजणार…?

खुदावाडी पंचायत समिती गणातून विजयाची तुतारी वाजणार ..?
—————————————————
नळदुर्ग ( एस. के. गायकवाड ):
तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी पंचायत समिती गणातून निवडणूक लढविणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार पद्माकर पाटील यांची या मतदारसंघात विजयाची तुतारी वाजणार असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तविला जात आहे.
. तुळजापूर तालुक्यातील नंदगाव जिल्हा परिषद गट अंतर्गत येणाऱ्या ८४ खुदावाडी पंचायत समिती गणातून मौजे येडोळा येथील माजी सरपंच पद्माकर पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने तुतारी वाजविणारा माणूस या निवडणूक चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांनी आपल्या प्रचारात दिवसेंदिवस आघाडी घेतली असून अत्यंत सुत्रबद्ध पद्धतीने त्यांचा प्रचार चालू आहे. या गणात त्यांचा जनसंपर्क चांगला असून ते गत पंचवार्षिक मध्ये सरपंच असताना भटक्या विमुक्त जाती जमातीतील डवरी गोसावी समाजाच्या जवळपास ५० कुटुंबांना घरकुलाचा लाभ मिळवून देऊन बेघरांना हक्काचे घर मिळवून दिले आहे त्यांच्या या कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने एक उत्कृष्ट सरपंच म्हणून त्यांचा गौरव केला आहे.गोरगरिबांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करतात.शिवाय नंदगाव जिल्हा परिषद गटावर मुळातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असून नामदार शरदचंद्रजी पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे.तर भाजपा महायुतीने या मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या अनेक दिग्गज व निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून पुनश्च त्याच त्या उमेदवाराला उमेदवारी दिल्यामुळे भाजपा कार्यकर्त्यात नाराजी पसरली आहे.याचा फायदा तुतारीला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय भाजपाच्या एका कार्यकर्त्याने बंडखोरी करत अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे भाजप उमेदवारांना मिळणारी मते विभागली जाणार आहेत. त्यात राष्ट्रीय काँग्रेसच्या हाताला मिळणारी मते हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार,मनसेचे उमेदवार आणि अपक्ष उमेदवार यांच्यामध्ये विभागले जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पद्माकर पाटील यांनी आपल्या प्रचारात सातत्य ठेवल्यास त्यांचा विजय हा निश्चित मानला जात आहे.
शेवटी या पंचायत समिती गणात विकासाचे कमळ फुलणार की विकासाला गती देणारे राष्ट्रीय काँग्रेसचा हात बळकट होणार की शेवटी विजयाची तुतारी वाजणार हे येत्या ९ फेब्रुवारी रोजी निकालानंतर कळणार आहे.
.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india