नंदगाव जिल्हा परिषद गटात कमळ, मशाल आणि तुतारी वाजविणारा माणूस यामध्ये तिरंगी लढत होणार
——————————————————-
नळदुर्ग (एस. के.गायकवाड):
तुळजापूर तालुक्यातील नंदगाव जिल्हा परिषद गटात कमळ, मशाल आणि तुतारी वाजविणारा माणूस यातच तिरंगी लढत होत आहे.
भाजपा व मित्र पक्षाच्या महायुतीचे उमेदवार सिद्धेश्वर कोरे ऊर्फ सिध्दू आण्णा कोरे हे कमळ या चिन्हावर तर राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीचे उमेदवार सूर्यकांत सुरेश अरबळे हे मशाल या चिन्हावर व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अँड.अमोल पाटील हे तुतारी वाजविणार माणूस या चिन्हावर निवडणूक लढवित असून आपापल्यापरिणे प्रचार करित असले तरी भाजपाने प्रचारात आघाडी घेतली आहे.
राज्यात नगरपालिका निवडणुकीनंतर कधीही महापालिका व जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागणार हे ओळखून भाजपा महायुतीने निवडणूक जाहीर होण्याअगोदरच आपापल्या मतदारसंघांमध्ये निवडणुकीची तयारी करीत होते.पक्ष निरीक्षक उमेदवाराचा अंदाज घेत होते यातूनच नंदगाव जिल्हा परिषद गटातून सिध्देश्वर कोरे यांच्या नावाची चर्चा अगोदरच चालू होती.प्रत्यक्ष निवडणूक जाहीर झाल्यानंतर मात्र भाजपाकडे इच्छुक उमेदवारांची नावे वाढत गेली त्यात अंतिम टप्प्यात सिद्धार्थ कोरे आणि सलगरा (ततार) येथील ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीप सोमवंशी ही नावे पुढे आली यातून पक्षश्रेष्ठीने सिद्धेश्वर कोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असून सिध्दार्थ कोरे हे मूळचे नंदगाव येथीलच रहिवाशी असून त्यांचे स्थानिक पातळीवर सामाजिक कार्यात,राजकीय कार्यात मोठी पक्कड असून ते अनेक वर्ष ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच म्हणून प्रतिनिधित्व केले आहेत. शिवाय एक टर्म त्यांनी नंदगाव पंचायत समिती गणाचे सदस्य म्हणूनही जनतेचे प्रतिनिधित्व केले आहे.अत्यंत निरपेक्ष भावनेने जनतेची सेवा ते करतात त्यामुळे या गटांमध्ये त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.
परंतु अलीकडच्या काळात नंदगावातीलच उद्योजक सुर्यकांत आरबळे हे आपल्या कार्यातून गावात व या गटात एक सक्षम नेत्रत्व म्हणून पुढे येत आहेत.एका नव्या चेहऱ्याला संधी देण्याच्या मनस्थितीत या नंदगाव गटातील मतदार आहेत. त्यामुळे भाजप चे सिद्धू अण्णा कोरे यांच्या विरोधात सक्षम उमेदवार म्हणून शिव सेना (उबाठा) व राष्ट्रीय काँग्रेस महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिव सेनेने सुर्यकांत अरबळे यांना उमेदवारी दिली असून ते शिवसेनेच्या मशाल या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवीत आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने पवार घराण्याची एकनिष्ठ असलेले वागदरी ता.तुळजापूर येथिल उच्चविद्याभूषित अँड.अमोल पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने उमेदवारी दिली असून ते स्वबळावर आत्मविश्वासाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आतापर्यंत या गटात केलेल्या कामाच्या आधारावर नामदार शरदचंद्रजी पवार यांना मानणाऱ्या मतदारांच्या विश्वासावर ते तुतारी वाजविणारा माणूस या चिन्हावर निवडणूक लढवीत आहेत. प्रत्येक जण आपापल्या परीने आरोप प्रत्यारोप करत विकासाच्या गप्पा मारत प्रचार करीत आहेत. या प्रचारांमध्ये भाजपाच्या कमळ चिन्हाने मोठी अघाडी घेतलेली दिसते आहे. प्रत्येकजन उमेदवाराचे नाव न घेता फक्त कमळला विजयी करा असाचं प्रचार करित आहेत.एकंदरीत नंदगाव जिल्हा परिषद गटात कमळ, मशाल, आणि तुतारी वाजविणार माणूस यांच्यात तिरंगी लढत होत असून अपक्ष उमेदवाराची मते कोणाच्या पथ्यावर पडणार आहेत हे निवडणूक निकाल नंतर कळेल.






