Best News Portal Development Company In India

भक्ती-शक्तीची देवता श्री तुळजाभवानी चरणी लातूर येथील भक्त नेहा अंधारे यांच्याकडून ७६.६१०/-ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण!

भक्ती शक्तीची देवता आई तुळजाभवानी चरणी लातूर येथील नेहा अंधारे या भक्ताकडून ७६,६१०/-ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र अर्पण!
तुळजापूर प्रतिनिधी/-श्रद्धा भक्ती आणि कृतज्ञता यांचा त्रिवेणी संगम दिनांक 3 फेब्रुवारी रोजी पहावयास मिळाला आई तुळजाभवानीच्या चरणी असंख्य भाविक आपली श्रद्धा, नवस आणि कृतज्ञता ची भावना अर्पण करतात. याच परंपरेतून लातूर येथील भक्त नेहा शामराव अंधारे आई जगदंबे चरणी ७६.६१० ग्राम सोन्याचे मंगळसूत्र अर्पण करून कृतज्ञता व्यक्त केली.
मनी मंगळसूत्र हा विवाहितेसाठी दागिना नसून स्त्रीच्या संसाराचे ,श्रद्धेचे आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. असा पवित्र दागिना देवीच्या चरणी अर्पण करणे म्हणजे सर्वोच्च भक्तीचे प्रतीक असेच म्हणावे लागेल. यातून एक जाणीव प्रकर्षाने समोर येते ती म्हणजे श्री तुळजाभवानी एक देवता नसून लाखो भाविक भक्तांच्या कुटुंबाचा एक आधारवड आहे. तिच्या चरणी अर्पण केलेली वस्तू भाविक भक्ताच्या मनातील तिच्याविषयी असलेल्या श्रद्धेची साक्ष देते.
पण देवीच्या कृपेपुढे कोणतीही वस्तू मोठी नसते. म्हणूनच कोणती गोष्ट देवीच्या चरणी अर्पण करताना भक्ताच्या मनात श्रद्धा ,शांतता आणि समाधान असते.
आई तुळजाभवानी चरणी अनेक वर्षानुवर्ष सोने ,चांदी ,दागिने, रोख रक्कम अर्पण करण्याची किंवा नवसपूर्ती करण्याची ही जुनी परंपरा आहे. देवीच्या चरणी आलेल्या देणगीचा उपयोग मंदिर संस्थान मंदिराच्या विकासासाठी, सामाजिक उपक्रमासाठी व धार्मिक कार्यासाठी केला जातो.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने नेहा अंधारे यांचा श्री तुळजाभवानी श्री प्रतिमा व महावस्ञ भेट देऊन योग्य तो सन्मान करण्यात आला याप्रसंगी सहाय्यक जनसंपर्क अधिकारी उमाकांत क्षीरसागर, तसेच मंदिर संस्थांचे इतर कर्मचारी उपस्थित होते

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india