नंदगाव जिल्हा परिषद गटात भाजपा महायुतीच्या पदयात्रेला प्रचंड प्रतिसाद
—————————————————
नळदुर्ग (एस.के.गायकवाड):
सध्या होऊ घातलेल्या तुळजापूर तालुक्यातील नंदगाव जिल्हा परिषद गटातील व गणातील भाजप उमेदवाराच्या पदयात्रेला जनतेतून प्रचंड प्रतिसाद मिळत असून या प्रचार पदयात्रेत ग्रामस्थ,युवकासह महिलांचा ही मोठा सहभाम असल्याचे दिसून येत आहे.
नंदगाव जिल्हा परिषद गटातून येथिल सिध्देश्वर कोरे हे भाजपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार म्हणून कमळ या चिन्हावर निवडणूक लढवीत असून या गटांतर्गत येणाऱ्या नंदगाव पंचायत समिती गणातून भाजपा महायुतीचे उमेदवार म्हणून रोहिणी विवेकानंद मिलगिरी तर याच गटांतर्गत येणाऱ्या खुदावाडी पंचायत समिती गणातुन एक निष्ठावंत व अभ्यासू व्यक्तीमत्व असलेले लोहगाव येथील भिवाजी इंगुले हेही कमळ या चिन्हावर महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत आहेत.या गटातील आणि गटांतर्गत येणाऱ्या गणातील प्रचारार्थ काढण्यात आलेल्या पदयात्रेस जनतेतून मोठा प्रतिसाद मिळतआहे.
. खुदावाडी गणातील खुदावाडी,वागदरी,येडोळा, लोहगाव,गुजनूर,दहिटणा आदी गावातून पदयात्रा काढण्यात आली.या पदयात्रेत विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करत तुळजापूर तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली नंदगाव गटात झालेल्या आणि होत असलेल्या विकास कामाचा मुख्य मुद्दा करून मतदाराना प्रभावित करताना दिसून येत आहे.






