.माई रमाईच्या त्यागामुळेच महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना दलित उद्धारासाठी आणि राष्ट्रहितासाठी काम करण्याची संधी मिळाली : राजकुमार गजदाने
—————————————————–
नळदुर्ग (एस.के.गायकवाड) :
बाल वयातच आई-वडिला विना पोरकी झालेली माई रमाई भिमराव आंबेडकर यांनी आपल्या जिवनामध्ये खूप मोठा त्याग केला. फार मोठे कष्ट सोशिले प्रसंगी शेन गोवऱ्या थोपल्या, लाकडाच्या मोळी विकून आपला संसार भागविला आणि डॉॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक कार्यात बाबासाहेबांना समर्थ साथ दिली अशा त्याग मूर्ती माई रमाई आंबेडकरांच्या त्यागामुळेच महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर उपेक्षित दलितांच्या उध्दारासाठी,महिला, शेतकरी कष्टकरी कामगारांच्या न्याय हक्कासाठी आणि राष्ट्रहिताकरिता काम करू शकले व देशातल्या तमाम नागरिकांना त्यांचे मानवी हक्क मिळवून देणारे भारतीय संविधान देशाला देऊ शकले असे गौरवशाली उद्दगार चपळगाव तालुका अक्कलकोट येथील भिमशाहीर राजकुमार गजदाने यानी वागदरी ता.तुळजापूर येथे बोलताना काढले.
मातोश्री रमाई आंबेडकर महिला मंडळ वागदरी ता.तुळजापूर व समस्त बौद्ध बांधवांच्या वतीने वागदरी येथे त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंती निमित्ताने अभिवादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी भिमशाहिर राजकुमार गजदाने प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे विद्यमान सरपंच सौ.तेजाबाई शिवाजी मिटकर ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून येथील ज्येष्ठ कार्यकर्ते मार्गदर्शक शिवाजी मिटकर गुरुजी, सेवानिवृत्त पोलीस हवालदार संदिपान वाघमारे, भिम शाहीर राजकुमार गजदाने आधी होते.या प्रसंगी रिपाइं (आठवले ) चे धाराशिव जिल्हा सचिव तथा पत्रकार एस.के. गायकवाड यांचेही मार्गदर्शनपर भाषण झाले.
. प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यागमूर्ती माई रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी शालेय विद्यार्थीनिनीने रमाई च्या गीतावर सामुहीक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी जेष्ठ कार्यकर्ते दत्तू नाना वाघमारे, कुंडलिक वाघमारे, उत्तम झेंडारे,अनिल वाघमारे,महादेव वाघमारे, शिवाजी वाघमारे,दत्ता झेंडारे,सूर्यकांत वाघमारे,दीपक वाघमारे,सत्यपाल वाघमारे, हनुमंत वाघमारे,उज्वला वाघमारे, श्रीदेवी वाघमारे, वंदना वाघमारे,कविता गायकवाड, गेंदाबाई बनसोडे,ठकुबाई वाघमारे,गीताबाई झेंडारे, प्रमिला वाघमारे,रेखाबाई झेंडारे,शुष्मा वाघमारे,कमल धाडवे,सह महिला युवा कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी पंचशिल गायण पार्टी वागदरीच्या भिमगित गायणाने कार्यक्रमाची सांगता झाली.






