Best News Portal Development Company In India

35 वर्षात पहिल्यांदाच सफाई कामगाराचा वाढदिवस साजरा!

३५ वर्षांत प्रथमच सफाई कामगाराचा वाढदिवस साजरा

नगरसेवक सचिन गायकवाड यांच्याकडून समाजात नवा आदर्श
अविनाश जोशी/करमाळा
करमाळा शहरात ३५ वर्षांपासून अविरत सेवा देणाऱ्या सफाई कामगार बांधव सुनील मामा खरात यांचा वाढदिवस प्रथमच सार्वजनिक पातळीवर साजरा करण्यात आला. हा उपक्रम करमाळा नगरपरिषदेचे नूतन नगरसेवक सचिन गायकवाड यांच्या पुढाकारातून राबविण्यात आला असून, या कृतीने समाजासमोर एक सकारात्मक आणि प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
ज्या सफाई कामगारांना अनेकदा समाजात दुर्लक्षित केले जाते, ज्यांच्याशी उभे राहणेही काहीजण टाळतात, त्या कामगारांनाही सन्मान, आणि माणूस म्हणून प्रतिष्ठा मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. वंचित घटकांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलावा, या भावनेतून नगरसेवक सचिन गायकवाड यांनी सफाई कामगारांचे वाढदिवस साजरे करण्याची सुरुवात केली आहे.
या प्रसंगी करमाळा शहराचे उपनगराध्यक्ष अतुल भैया फंड, नगरसेवक प्रशांत ढाळे ,अमोल आबा यादव यांच्यासह मोठ्या संख्येने सफाई कामगार बांधव उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी सुनील मामा खरात यांच्या दीर्घ सेवेला सलाम करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
हा उपक्रम केवळ वाढदिवस साजरा करण्यापुरता मर्यादित न राहता, समाजातील प्रत्येक घटक समान आहे, प्रत्येक श्रमाला सन्मान मिळायलाच हवा, हा संदेश देणारा ठरला आहे. करमाळा शहरातील नगरसेवकांनी सुरू केलेला हा अभिनव उपक्रम निश्चितच इतर सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india