Best News Portal Development Company In India

गोवंशीय जातीच्या जनावरांची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वर स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव पोलिसांची कडक कारवाई!

गोवंशीय जातीच्या जनावरांचे अवैद्य वाहतूक करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे  शाखा धाराशिव पोलिसांची धडक कारवाई!
– – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – –
तुळजापूर प्रतिनिधी/   गोवंश  हत्या कायदा  कडक  असूनही  काहीजण  चोरट्या  मार्गाने  अवैधरित्या वाहतूक करून  गोवंश  जातीची  जनावरे कत्तलीसाठी  घेऊन  जात  असताना. स्थानिक  गुन्हे  शाखेचे  कर्तव्यदक्ष    पोलीस श्री विनोद इज्जपवार यांनी   धडक कारवाई करत मुक्या जनावरांची       सुटका  करत  त्यांचे  प्राण  वाचवले.
दि . ०९/०२/२०२६  रोजी  १०:३० वाजण्याच्या  सुमारास  स्थानिक  गुन्हे  शाखा  धाराशिव  चे  पोलीस  श्री  विनोद इज्जपवार हे आपल्या सहकाऱ्यांसोबत (स्टाफ )पेट्रोलिंग करत असताना येडशी  ते  धाराशिव  रोडवर  आळणी  गावच्या पाटी  जवळ  त्यांना   एक (टेम्पो)  वाहन जनावरांची वाहतूक  करताना  आढळले.  त्या वाहनांमध्ये गोवंशीय जातीची जनावरे कत्तलखाण्यासाठी अवैधरित्या वाहतूक करत घेऊन जात असल्याचा संशय आला.    पोलिसांनी सदरच्या वाहनास थांबवून बाजूला  घेण्याचा  इशारा  केला. त्या    वाहन  चालकाने गाडी रोडच्या साईडला   लावली. वाहनाची तपासणी केली.   असता वाहनांमध्ये गोवंशीय जातीची जनावरे अत्यंत दाटीवाटीने भरल्याचे आढळले. प्राथम दर्शनी  चौकशी  केली   असता वाहन चालकाने उडवा उडवीची   व  असमाधानकारक  अशी उत्तरे दिली. तात्काळ सदरील वाहन धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात आणण्यात आले. (२) पंचांच्या साक्षीने सदर वाहनाची तपासणी करण्यात आली. वाहनांमध्ये गोवंशीय जातीची जनावरे आणि सदरील वाहनासह एकूण ९,१५,०००/- ₹  मुद्देमाल जप्त करण्यात आला वाहनातील गाईंना अत्यंत त्रासदायकरीत्या दाटीवाटीने जनावरांना हालचाल करण्यास पुरेशी जागा नव्हती. यावरून पोलिसांनी गुन्हा नोंदणी क्रमांक ३४/२०२६ प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा अधिनियम १९६०चे कलम ११ (१)(D)(E)(H) महाराष्ट्र प्राणी संरक्षण  १९९५ चे कलम ५(अ)(१).९ अन्यवे   गुन्हा नोंदविला आहे . पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल ११२२ शिंदे, पोलीस  स्टेशन ग्रामीण हे करत आहेत.
सदरील लक्षणीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना ,  यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री विनोद इज्जपवार साहेब, पोलीस हवालदार दत्तात्रेय राठोड, पोलीस हवालदार दयानंद गादेकर, पोलीस हवालदार बळीराम शिंदे, पोलीस नायक श्री. अशोक ढगारे, पोलीस अंमलदार प्रकाश बोईनवाड, धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनचे हवलदार श्री. अविनाश शिंदे, पोलीस हवालदार विशाल खोसे यांनी केली आहे.
या कारवाईने अवैद्य त्रासदायक जनावरांची अमानुष वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले असेलच मात्र या कारवाईने जिल्ह्यातील वन्यजीव प्राणी मित्रांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. तसेच धाराशिव जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा कौतुकास पात्र ठरत आहेत.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india