Best News Portal Development Company In India

स्वतःच्या पहिल्या कमाईतून प्रोजेक्टर, प्राथमिक शाळेस भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला!

स्वतःच्या पहिल्या कमाईतून प्रोजेक्टर प्राथमिक शाळेस भेट देऊन विद्यार्थ्या सोबत अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला : एका सुसंस्कृत आईची आणि संस्कारक्षम मुलाचा हा प्रेरणादायी उपक्रम
——————————————————-
नळदुर्ग (एस.के.गायकवाड):
वाढदिवस म्हटलं की एखादं फाईव्ह स्टार हॉटेल बुक करणे किंवा रिसॉर्ट बुक करणे डीजे लावून आईस केक कापून मनमुराद नाचणे, खाणे पिणेआलेचं अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचं तरुणाई मध्ये सध्या फॅड निर्माण झाला आहे.परंतु अशा सर्व चंगळवादाला फाटा देऊन उस्मानाबाद येथील श्वेत शैलेस टिळक या तरुणांनी मात्र महामाता रमाई आंबेडकर याना आभिवादन करून,आपल्या पहिल्या कमाईच्या पगारातून एक छानसा प्रोजेक्टर विकत घेऊन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिमनगर नळदुर्ग ता.तुळजापूर येथे शाळेस विद्यार्थ्यांसाठी भेट देऊन विद्यार्थ्या समवेत व्हेज बिर्याणीचे जेवण करून आपला वाढदिवस साजरा करून समाजाला एक प्रेरणादायी संदेश दिला आहे.
या बाबत अधिक माहिती असी की चिरंजीव श्वेत टिळक यांच्या मातोश्री सुलक्षणा टिळक ह्या सहशिक्षका या पदावर नोकरीस असून त्या सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिम नगर नळदुर्ग येथे सेवेत कार्यरत आहेत.त्या दररोज आपल्या फोर व्हीलर गाडीतून धाराशिव ते नळदुर्ग ये जा करून विद्यार्थी घडवण्याचं काम करता.गेल्या एक महिण्या पासून दरमहा दहा हजार मानधनावर आपल्या स्वतःल्या गाडीवर आपला मुलगा श्वेत टिळक यांना चालकाची नोकरी दिली. उद्देश एकचं मुलाच्या रिकाम्या हाताला काम मिळेल.आणि आपल्या कार्यात मदत होईल या उद्देशाने त्यांनी चालक म्हणून आपल्या मुलाला सोबत घेतले.आणि त्यांना व्यवहारिक दृष्ट्या दरमहा दहा हजार रुपये पगार देण्याचे ही कबुल केलं. तेंव्हा पासून कुमार श्वेत हा आपल्या आई सोबत गाडी चालक म्हणून धाराशिव नळदुर्ग ये जा करत आहे.दि.१ फेब्रुवारी २०२६ रोजी त्याचा महिना भरला आणि आईने त्याला त्याच्या कमाईचा पहिला पगार रुपये दहा हजार दिले.नेमक दि.९ फेब्रुवारी रोजी त्यांचा वाढ दिवस होता.दि.७ व ८ फेब्रुवारी रोजी सलग शाळेला सुट्टी असल्याने दि. ९ फेब्रूवारी रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिम नगर नळदुर्ग येथे माई रमाई आंबेडकर जयंती साजरी करण्याचे आयोजन मुख्याध्यापक एस.यु. शेख यानी केले होते. नेमका त्याच दिवसी श्वेत टिळक यांचा वाढदिवस होता.तेंव्हा त्याने आपला वाढदिवस आपल्या मित्र सोबत साजरा करण्यापेक्षा आपल्याला मिळालेल्या पहिल्या पगारातून त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिमनगर नळदुर्ग या शाळेत एक छानसा प्रोजेक्टर विकत घेतला आणि आपल्या आई समवेत मात रमाई आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने महामाता रमाई आंबेडकर यांना अभिवादन करून त्यांनी तो प्रोजेक्टर शाळेचे मुख्याध्यापक एस.एस. शेख याना शाळेसाठी भेट म्हणून दिला.आणि खतःच्या पैशातून व्हेज बिर्याणीचे भोजन विद्यार्थ्यांना दिले.अशा प्रकारे विद्यार्थ्या सोबत आपला वाढ दिवस साजरा करून कुमार श्वेत एक वेगळी प्रेरणादायी दिशा समाजाल दिलीआहे.या बाबात बोलताना श्र्वेत यांच्या मातोश्री सहशिक्षीका सुलक्षणा टिळक म्हणाल्या की एका सुसंस्कार मुलाची आई झाल्याचा मला आनंद आहे. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक एस.यु.शेख सह पालक विद्यार्थी उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india