जळकोट येथे चोराचा सुळसुळाट
कायमस्वरूपी गस्त पथक नियुक्त करावे : ॲड . आशिष सोनटक्के
– – – – – – – – – – – – – – – – – – – –
जळकोट (अरुण लोखंडे ) तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे गेल्या आठ दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून नागरिकांत भितीचे वातावरण पसरल्याचे चित्र पहावयास मिळते आहे .
याबाबत प्राप्त माहिती अशी की जळकोट हे गाव राष्ट्रीय महामार्गावर वसलेले असून गावाला मोठी बाजारपेठ आहे . रोज हजारो नागरीक या ठिकाणी बाजार हाट खरेदी करण्याकरिता येत जात असतात . गावात अनेक प्रकारची व्यापारी मंडळी याची दुकाने आहेत . याचा फायदा घेत चोरटे घरफोडी दुकान फोडून चोरटे पसार होत आहेत यामुळें व्यापाऱ्यासह नागरीकांत भिती पसरली आहे . कारण या आठवडयात रोज चोरटे गावात कोणाचे घर तर कोणाचे दुकान फोडत आहेत . यामुळे कायमस्वरूपी गस्त पथकाची नियुक्ती करावी व झालेल्या चोरी संदर्भात तात्काळ शोध घेवून चोरटयांचा बंदोबस्त करावा आणि जळकोट येथे आऊट पोस्ट पोलीस चौकी करावी या संमंधी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा नुतन पंचायत समितीचे सदस्य ॲड आशिष सोनटक्के यांनी लेखी निवेदनाद्वारे नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन यादव साहेब यांच्याकडे केली आहे . यावेळी संजय अंगुले नागनाथ किलजे अरुण लोखंडे प्रविण जाधव आदी उपस्थित होते .






