शिवजयंती निमित्ताने वागदरी येथे शिव सप्ताहाचे उद्घाटन : विविध कार्यक्रमाचे केले आयोजन
—————————————————-
नळदुर्ग ( एस. के. गायकवाड):
सालाबाद प्रमाणे तुळजापूर तालुक्यातील मौजे वागदरी येथे शिवजयंतीच्या निमित्ताने दि.१३ फेब्रुवारी २o२६ रोजी शिव सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले असून दि.१३ ते १९ फेब्रुवारी दरम्यान शिव सप्ताह निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दिनांक १९ फेब्रुवारी २o२६ रोजी भव्य मिरवणुकीने या सप्ताहाची सांगता करण्यात येणार आहे.
. शिव- बसव- राणा व काशीबा महाराज जन्मोत्सव मंडळ वागदरी ता. तुळजापूरच्या वतीने दरवर्षी शिवजयंतीचे औचित्य साधून शिव सप्ताहाचे आयोजन करण्यात येते.याही वर्षी जन्मोत्सव मंडळाच्या वतीने शिव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून दिनांक १३ फेब्रुवारी २o२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा बसवेश्वर, महाराणा प्रताप व श्री संत काशिबा महाराज यांच्या प्रतिमांची प्रतिष्ठापना करून शिव सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले असून या निमित्ताने दि. १४ फेब्रवारी रोजी शिवपुजा, दि.१५ फे. रोजी महाशिवरात्री, दि.१६ फे. रोजी शालेय विद्याथ्यांची सामान्य ज्ञान स्पर्धा, दि.१७ फेब्रुवारी रोजी सकाळी शिव पुजा व भव्य रक्तदान शिबिर,दि. १८ फेब्रूवारी रोजी महिलांचा सांस्कृतीक कार्यक्रम तर दि. १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, महाराणा प्रताप व श्री संत काशिबा महाराज यांच्या प्रतिमांची पालकीतून भव्य मिरवणूक काढून या शिव सप्ताहाची सांगता करण्यात येणार आहे. तर सामान्य ज्ञान स्पर्धेत प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या स्पर्धकाना अनुक्रमे ११०००,५०००,२५०० रु रोख रक्कम व प्रत्येक सहभागी स्पर्धकाना स्कूल बॅग व शालेय साहित्य देण्यात येणार आहे.असी माहिती जन्मोत्सव मंडळाच्या वतीने उद्घाटन प्रसंगी देण्यात आली.
. या वेळी अँड.अमोल पाटील, जन्मोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रशांत यादव, उपाध्यक्ष रवी यादव, सचिव भगतसिंग ठकूर, मिरवणूक प्रमुख रामसिंग चव्हाण,रमेश पवार,सह जेष्ठ नागरिक व युवा कार्यकर्ते उपस्थित होते.






