Best News Portal Development Company In India

उन्हाच्या झाळांपासून भाविकांना दिलासा! श्री तुळजाभवानी देवी मंदिर परिसरात ग्रीन नेट ची सोय.

उन्हाच्या झळांपासून भाविकांना दिलासा!
श्री तुळजाभवानी देवी मंदिर परिसरात ग्रीन नेटची सोय

तुळजापूर | प्रतिनिधी

हिवाळ्याची थंडी ओसरताच उन्हाळ्याची चाहूल लागली असून दिवसेंदिवस सूर्याची तीव्रता वाढत आहे. दुपारच्या वेळी कडक उन्हामुळे भाविकांना होणारा त्रास लक्षात घेऊन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून भाविकांसाठी दिलासादायक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
देशभरातून दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांना उन्हाच्या झळांपासून संरक्षण मिळावे, यासाठी मंदिर परिसरातील प्रवेश मार्ग व दर्शन रांगेच्या ठिकाणी ग्रीन नेट बसविण्यात आले आहेत. थेट सूर्यकिरणांचा प्रभाव कमी होत असल्याने परिसरात सावली निर्माण झाली असून भाविकांना मोठा दिलासा मिळत आहे.विशेषतः दुपारच्या वेळेत व गर्दीच्या दिवशी भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. अशा वेळी उष्णतेमुळे होणारा त्रास टाळण्यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरत आहे. ग्रीन नेटमुळे केवळ उन्हापासून संरक्षणच नव्हे, तर परिसर अधिक शीतल व आरामदायी ठेवण्यासही मदत होत आहे.भाविकांचे आरोग्य व सोयीला प्राधान्य देत मंदिर संस्थानकडून अशा सुविधा वेळोवेळी राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. यामुळे भाविक शांततेत व समाधानाने देवींचे दर्शन घेऊ शकत आहेत.श्री तुळजाभवानी देवींच्या भाविकांना उत्तमोत्तम सुविधा देण्यासाठी मंदिर संस्थान कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार यावेळी करण्यात आला आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india