Best News Portal Development Company In India

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरमन तांडाजळकोट येथे संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी!

*जि. प. प्रा. शा. बोरमन तांडा जळकोट येथे संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी…
– – – = – – – – – – – – – – – – – –
जळकोट (अरुण लोखंडे)

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील जिल्हा परिषद. प्राथमिक. शाळा. बोरमन तांडा येथील ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यामाने *संत शिरोमणी सेवालाल महाराज* यांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली… कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला…

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक *श्री किशोर कुमार चौधरी सर* हे आपले मनोगत व्यक्त करताना संत सेवालाल महाराजांच्या जीवनकार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले… व त्यांनी समाजाला दिलेला निसर्गसंवर्धन, समानता, शिक्षण व बंधुत्वाचा संदेश विद्यार्थ्यांनी आचरणात आणावा, असे आवाहन केले व ते पुढे बोलताना म्हणाले की,

संत सेवालाल महाराज यांनी समाज प्रबोधनाचे मोठे कार्य केले… त्यांनी *”रपीया कटोरो पांळी वक जाय । कसाईन गावढी मत वेचो ।”* अर्थात, भविष्यात एका रुपयाला एक वाटी पाणी विकत घ्यावे लागेल, म्हणून पाण्याचे जतन करा… गायीला खाटीकाला विकू नका, प्राण्यांवर प्रेम करा… असे म्हणत निसर्ग संवर्धन व जीवनविषयक विचार मांडले… पुढे ते *”शिखच शिकवाच शिखे राज धडावच, शिखा जेरी सज्पोली, घियानापोली ।”*
अर्थात, समाज शिक्षण प्राप्त करून सुशिक्षित व्हा आणि आपला समाजही सुशिक्षित करा… असा नैतिकतेचा धडाही त्यांनी आपल्या समाजबांधवाला दिला आहे असे ते म्हणाले
याच कार्यक्रमाचे अवचित साधुन तांड्यातील ग्रामस्थाच्या वत्तीने सेवालाल महाराजाच्या पवित्र मंदिरात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व नुतन पचायत समीती सदस्य ॲड : आशिष सोनटक्के यांचा व शाळेचे मुख्याध्यापक किशोर चौधरी सर महेश कुंभार याचा सत्कार करण्यात आला .
त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगते व्यक्त केले सदरच्या कार्यक्रमास शिक्षक पालक व विद्यार्थी व तांड्यातील नागरीकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला… कार्यक्रमाचे आयोजन शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडले… शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महेश कुंभार सर केले . त्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली…

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india