Best News Portal Development Company In India

वागदरी येथे श्रीशैल मल्लिकार्जुन मंदिरात महाशिवरात्री यात्रा महोत्सव विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमाने मोठ्या उत्साहात संपन्न!

वागदरी येथे श्रीशैल मल्लिकार्जुन मंदिरात महाशिवरात्रि यात्रा महोत्सव विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमाने मोठ्या उत्साहात संपन्न
————————————————————–
नळदुर्ग ( एस. के. गायकवाड ):
शिवभक्तीतून व्यसनमुक्तीचे केंद्र म्हणून सर्वत्र परिचित असलेल्या तुळजापूर तालुक्यातील मौजे वागदरी येथील कै.श्रीशैल्य सुरेश पाटील महाराज यांच्या श्रीशैल्य मल्लिकार्जुन महादेव मंदिर मठात मंदिराचे पुजारी श्रीशैल्य जितेंद्र सुरेश पाटील यांच्या अधिपत्याखाली महाशिवरात्रीनिमित्त यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या निमित्ताने विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
. प्रति वर्षा प्रमाणे या ही वर्षी महाशिवरात्री निमित्त वागदरी ता.तुळजापूर येथील श्रीशैल्य मल्लिकार्जुन महादेव मंदिरात महाशिवरात्री यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या निमित्ताने विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम करण्यात आले.
. प्रारंभी येथील महादेव मंदिरातील महादेव मूर्तीचे पूजन करून होम पेटवून महाआरती करण्यात आली.या नंतर निमंत्रित मान्यवर,नंदगाव जिल्हा परिषद गटांतर्गत येणाऱ्या खुदावाडी पंचायत समिती गणातून निवडून आलेले नूतन पंचायत समिती सदस्य भिवाजी इंगुले व नंदगाव पंचायत समिती गणातून विजयी झालेल्या नूतन पंचायत समिती सदस्य सौ.रोहिणी विवेकानंद मिलगीरे तसेच नळदुर्ग नगर परिषदेचे नूतन नगरसेवक तथा विरोधी पक्ष गटनेते मारुती खारवे आणि परिसरातील सरपंच उपसरपंच मान्यवर कार्यकर्ते यांचा श्रीशैल्य मल्लिकार्जुन महादेव मंदिराचे पुजारी जितेंद्र पाटील महाराज यांच्या वतीने येतोचित सत्कार करण्यात आला.यावेळी उपस्थित सर्व भाविक भक्त मान्यवर व ग्रामस्थांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.रात्री ठीक ९ ०० दरम्यान ह.भ.प.आबा महाराज चुंगीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. दि.१५ फेब्रुवारी २o२६ रोजी पहाटे चार वाजता महादेवास महाअभिषेक करण्यात आले. सकाळी सहाच्या दरम्यान होमातील अग्नी प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी अनेक भाविक भक्तांनी अनवाणी पायाने अग्नी प्रवेश करून विस्तवावरून चालत चालत गेले.शेवटी महादेवाचे पूजन करून महाआरती करून या यात्रा महोत्सवाची सांगता करण्यात आली.
या प्रसंगी येथील श्री संत भवनसिंग महाराज भजनी मंडळासह ग्रामस्थ महिला युवा भाविक भक्त, वागदरी व परिसरातून आलेल्या भाविक भक्ता सह पर जिल्ह्यातून परराज्यातून आलेल्या भाविक भक्तानी या यात्रा महोत्सवात मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india