Best News Portal Development Company In India

वागदरी येथे ग्रामपंचायत व समस्त ग्रामस्थांच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी!

वागदरी येथे ग्राम पंचायत व समस्त ग्रामस्थांच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी
—————————————————–
नळदुर्ग (एस. के. गायकवाड):
अखंड हिंदुत्वाचे आराध्य दैवत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंती निमित्त वागदरी ता. तुळजापूर येथे ग्राम पंचायत कार्यालय व समस्त ग्रामस्थांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रारंभी येथील छत्रपती चौकात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवाजी मिटकर गुरुजी व सेवानिवृत्त पोलीस हवालदार संदिपान वाघमारे यांच्या हस्ते पूजन करून भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर सहवाद्य शिव सभागृहात जावून तिथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्थाकृती पुतळ्याचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करून फटाक्याची आतिश बाजी करत शिवरायांना अभिवादन करण्यात आले. शेवटी महाप्रसादाने शिव जयंतीची सांगता करण्यात आली.
या वेळी या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक भारतीय जनता पार्टीचे तालुका उपप्रमुख किशोर सुरवसे,भाजपाचे बुथ प्रमुख मदन पाटील सरपंच तेजाबाई मिटकर ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पाटील,
अमोल पवार माजी उपसरपंच दत्ता सुरवसे, सुरेखाबाई यादव,दीपक धुमाळ,ओम पाटील, बाळू पवार, प्रमोद सोमवंशी,जितेंद्र पाटील धरम सुरवसे युवा कार्यकर्ते अप्पा भंडारे सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india