श्री क्षेत्र संगोबा येथील आदिनाथ महाराज मंदिरात हजारो भाविकांनी महाशिवरात्री निमित्त घेतले दर्शन
अविनाश जोशी / करमाळा
श्री क्षेत्र संगोबा येथील पुरातन ३०० वर्षांपूर्वीच्या श्री आदिनाथ महाराज मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त हजारो भाविकांनी रांगा लावून हर हर महादेवाच्या घोषात जय जयकार करत दर्शन घेतले करमाळा तालुक्यातील सीना नदी काठावर तीनशे वर्षांपूर्वी श्री क्षेत्र संगोबा येथे आदिनाथ महाराजांचे पुरातन मंदिर असून या मंदिरात पंढरपूर येथील वास्कर परिवारातील ह. भ. प. नाथा महाराज वासकर यांच्या हस्ते मंदिरात शिवरात्रीनिमित्त विधीवत पूजा संपन्न झाली वासकर परिवारातील नाथा महाराज वासकर हे अकराव्या पिढीतील आहेत महाशिवरात्रीनिमित्त संगोबा येथे आदिनाथ महाराज मंदिरात मोठी यात्रा भरलेली असते यात्रेनिमित्त सकाळपासूनच मंदिर परिसरात खाद्यपदार्थासह स्टॉल खेळणी स्टेशनरीचे दुकान असे विविध प्रकारचे दुकाने उभारण्यात आलेले आहेत यंदा झालेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला पाणी वाहत असल्याने यात्रेसाठी आलेल्या भाविकांची सोय झाली आहे व यात्रेत वाहतूक व्यवस्था व कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तहसीलदार शिल्पा ठोकडे व पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी चोख व्यवस्था ठेवलेली आहे तसेच करमाळा एसटी आगराने ही श्री क्षेत्र संगोबा येथे जाण्यासाठी खास एसटी बसेसची व्यवस्था केल्याने भाविकांची सोय झाली आहे ही यात्रा दोन दिवस भरली जाते या यात्रेला बार्शी परंडा भूम कर्जत माढा अशा विविध गावावरून हजारो भाविक दर्शनासाठी येतात






