Best News Portal Development Company In India

नळदुर्ग बस स्थानकासाठी 24 तास नियंत्रकाची नेमणूक करावी व या बस स्थानकावर आगाऊ आरक्षणाची सोय करावी : भाजपा मीडिया सेलचे किशोर धुमाळसह प्रवाशांची मागणी!

नळदुर्ग बसस्थानकासाठी २४ तास वाहतूक नियंत्रकाची नेमणूक करावी व या बस स्थानकावर आगाऊ आरक्षणाची सोय करावी : भाजपा मिडीया सेलचे किशोर धुमाळ सह प्रवाशांची मागणी
————————————————–
नळदुर्ग (एस. के. गायकवाड) :
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर आगार अंतर्गत येणाऱ्या नळदुर्ग बस स्थानकावर २४ तास वाहतूक नियंत्रकाची नेमणूक करावी व या बस स्थानकात आगाऊ आरक्षणाची सोय तात्काळ करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी मीडिया सेलचे तुळजापूर तालुका अध्यक्ष किशोर धुमाळ वागदरीकर सह प्रवासी ग्रामस्थानी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
वाहतूक नियंत्रण धाराशिव बस स्थानक,जिल्हा धाराशिव यांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की तुळजापूर आगार अंतर्गत येणारे नळदुर्ग बस स्थानक हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ (पूर्वीचा ९) लगत असून महाराष्ट्रातच नव्हे तर देशात कुठेही जायचे असेल तर याचं बस स्थानकावर ग्रामीण भागातील प्रवाशांना यावे लागते.
. त्यामुळे या बसस्थानकावर नेहमीच प्रवाशांची वर्दळ असते. दिवसभर या बस स्थानकावरून मोठ्या प्रमाणात एसटी बस जातात व तसेच रात्रीच्या वेळेस लांब पल्ल्याच्या जवळपास महाराष्ट्रातून येणाऱ्या १५ ते २० बस या बसस्थानकावरून जातात त्यामुळे या बस स्थानकावर नेहमीच बस गाड्यांची व प्रवाशांची वर्दळ असते.परंतु सध्या या बस स्थानकावर सकाळी ठिक ६.ते रात्री १० वाजेपर्यंत वाहतूक नियंत्रक उपलब्ध असतात. त्यानंतर रात्रीच्या वेळी नळदुर्ग बस स्थानकावरती प्रवाशांच्या सेवेसाठी कोणीही कर्मचारी हजर राहत नाही. यामुळे अनेक वेळा महिला प्रवाशांना व शालेय विद्यार्थ्याला नाहक त्रास सहन करावा लागतो.
तरी प्रवाशांची व विद्यार्थ्यांची मागणी आहे की या बसस्थानकावर २४ तास वाहतूक नियंत्रक ऑफिस चालू राहावे व प्रवाशांना वाहतूक नियंत्रकाची सुविधा मिळावी तसेच नळदृग व परिसरातील प्रवाशांना मुंबई, पुणे, संभाजीनगर, हैदराबाद, अक्कलकोट जाण्या-येण्याकरिता याचं बस स्थानकावर यावे लागते.या ठिकाणी आगाऊ आरक्षणाची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना सीट आरक्षणासाठी उमरगा,तुळजापूर,सोलापूर अशा ठिकाणी जावे लागते. त्यामुळे नाहक वेळ व पैसा खर्च करावा लागत आहे.
तरी प्रवाशांच्या सोयीसाठी या बस स्थानकावर वाहतूक नियंत्रकाची २४.तास सेवा उपलब्ध करून या बसस्थानकावर आगाऊ आरक्षणाची सुविधा तात्काळ उपलब्ध करावी अशी मागणी लेखी निवेदनात केली आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india