Best News Portal Development Company In India

अवैध मद्य विरोधी कारवाई ; नळदुर्ग पोलिसांची धडक मोहीम, दोन गुन्हे दाखल!

अवैध मद्य विरोधी कारवाई ; नळदुर्ग पोलिसांची धडक मोहीम, दोन गुन्हे दाखल!                                    तुळजापूर प्रतिनिधी ;-
नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध मद्य विक्रीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत दोन ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणात गावठी व देशी-विदेशी मद्य जप्त केले आहे. या कारवाईत दोन आरोपींविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या घटनेत आरोपी धोंडाबाई नारायण वाघमारे (वय 62 वर्षे, रा. ईटकळ ता. तुळजापूर, जि. धाराशिव) याच्या ताब्यातून दि. 25 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 3.45 वाजण्याच्या सुमारास ईटकळ येथे, ईटकळ ते नळदुर्ग जाणाऱ्या रस्त्यालगत त्याच्या राहत्या घरासमोरून अंदाजे ₹5,200 किमतीची 50 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. ही दारू अवैध विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आली होती.
तसेच दुसऱ्या कारवाईत आरोपी अविनाश परमेश्वर बनसोडे (वय 36 वर्षे, रा. बौद्ध नगर, नळदुर्ग ता. तुळजापूर, जि. धाराशिव) याच्या ताब्यातून त्याच दिवशी सायंकाळी 7.50 वाजता नळदुर्ग येथे प्रिन्स बिअर बारच्या मागील बाजूस, ज्योती सोनकांबळे यांच्या घराच्या पाठीमागील मोकळ्या जागेतून अंदाजे ₹5,400 किमतीची 50 लिटर गावठी दारू व देशी-विदेशी दारूच्या 20 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. ही मद्यसाठाही अवैध विक्रीसाठी ठेवण्यात आला होता.
या दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी अवैध मद्य जप्त करून संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम 65 (ई) अन्वये नळदुर्ग पोलीस ठाण्यात स्वतंत्र दोन गुन्हे नोंदविले आहेत.
नळदुर्ग पोलिसांकडून सुरू असलेल्या या मोहिमेमुळे परिसरातील अवैध मद्यविक्रीवर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच नागरिकांनी अशा प्रकारच्या बेकायदेशीर व्यवसायाची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india