Best News Portal Development Company In India

कळंब येथील ज्येष्ठ कार्यकर्ते डी.जी. हौसलमल यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह रिपाई (आठवले) पक्षात प्रवेश!

कळंब येथील ज्येष्ठ कार्यकर्ते डी.जी.हौसलमल यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह रिपाइं (आठवले) पक्षात प्रवेश
—————————————————-
नळदुर्ग (एस.के.गायकवाड ):
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार डॉ.रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य जॉईट सेक्रेटरी मा.राजाभाऊ ओहाळ यांच्या मार्गदर्शनाखाली व मा.विद्यानंद बनसोडे जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली मा.डी.जी. हौसलमल यांचा रेस्ट हाऊस धाराशिव येथे असंख्य कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केला
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात मा डी.जी. हौसलमल यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला.हा प्रवेश पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले साहेब यांच्या आदेशानुसार पार पडला.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र जॉईंट सेक्रेटरी मा.राजाभाऊ ओव्हाळ, जिल्हाध्यक्ष मा.विध्यानंद बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना वक्त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त केला. सामाजिक न्याय, समता व संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी पक्षाच्या माध्यमातून सक्रियपणे कार्य करण्याचा निर्धार नवप्रवेशित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
या जाहीर प्रवेशामुळे जिल्ह्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची ताकद वाढली असून आगामी काळात संघटनात्मक कार्य अधिक प्रभावी होईल,असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.यावेळी युवक तालुका अध्यक्ष विपिन हौसलमल किसन हौसलमल, खरात सर, रत्नदीप वाघमारे,किरण वाघमारे,ज्ञानेश्वर केदार, अभीजीत चौरे आदीसह कार्यकर्त्यानी प्रवेश केला.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india