श्री तुळजाभवानी मंदिरात 2 मार्च रोजी होळी (शिमगा) निमित्त विशेष अभिषेक पूजा व आरतीचे आयोजन!
तुळजापूर (प्रतिनिधी) : श्री तुळजाभवानी मंदिर येथे होळी (शिमगा) सणानिमित्त विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. मंदिर संस्थान प्रशासनाच्या वतीने याबाबत माहिती देण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, सोमवार दिनांक 02 मार्च 2026 रोजी सायंकाळी 06:00 वाजता अभिषेक पूजेची घाट होणार आहे. त्यानंतर रात्री 08:00 वाजता आरती व धुपारतीचा धार्मिक सोहळा. संपन्न होईल. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
मंदिरातील सर्व महंत, पुजारी, सेवेकरी तसेच भाविक भक्तांनी या कार्यक्रमाची नोंद घ्यावी आणि वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
ही माहिती तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) अरविंद बोळंगे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान यांनी दिली आहे. आपले सर्वच सणवार अत्यंत उत्साही आनंददायी आणि उल्हासितपणे साजरे करण्यास तुळजाभवानी मंदिर संस्थान सदैव तत्पर असते.







