राजे छत्रपती शिवजन्मोत्सव समीतीच्या वतीने नेत्ररोग शिबीर संपन्न
– – – – – – – – – – – – – – – – – – – –
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील राजे
शिवछत्रपती सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती जळकोट व शंकर शेठ साबळे नेत्र रुग्णालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने दि. 28 02/ 2026 वार शनिवार रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर जळकोट येथे आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपत्ती शिवरायांच्या पुतळ्याचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर सदरील
शिबिराचे उद्घाटन जळकोट येथील ज्येष्ठ नागरिक अशोक अण्णा कदम व हनुमंत सुरवसे यांच्या हस्ते संपन्न झाले, यावेळी डॉ. संजय कदम , नागराज जाधव, व्यंकट कदम, सुरज बारदाने, अँड. सचिन कदम, सोमनाथ स्वामी, आनंद धरणे व समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
या शिबिरामध्ये शंकर शेठ साबळे नेत्र रुग्णालय सोलापूर येथील तज्ञ डॉक्टरकडून जळकोट व जळकोट परिसरातील सुमारे 200व्यक्तींची मोफत डोळे तपासणी केली गेली. तसेच 50 गरजू व्यक्तींना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. या शिबिरामध्ये 90 व्यक्तींना मोतीबिंदू झाल्याचे निष्पन्न झाले. ज्या व्यक्तींना मोतीबिंदू निष्पन्न झाले आहे, त्या व्यक्तींचे मोफत ऑपरेशन केली जाणार आहे.*एवढेच नाही तर ऑपरेशन साठी जाण्याचा येण्याचा व त्या ठिकाणी राहण्याचा जेवण्याचा सर्व खर्च मोफत केला जाणार आहे*
ऑपरेशन दि.02/03/2026 रोजी शंकर शेठ साबळे नेत्र रुग्णालय सोलापूर येथे होणार असून, त्यांची गाडी उद्या दि.01/03/2026 रोजी छत्रपती शिवाजी चौक जळकोट येथे सकाळी ठीक 10 वाजता येणार असून ज्या व्यक्तींना ऑपरेशन करायला सांगितले आहे, त्यांनी सोबत येताना आधार कार्ड , रेशन कार्ड आणि एक वेळेस चा जेवणाचा डब्बा घेऊन चौकामध्ये हजर राहावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
शिबीर यशस्वी करण्यासाठी शिवजन्मोत्सव समितीच्या सर्व पदाधिकारी व गावातील शिवभक्तानी परिश्रम घेतले .





