Best News Portal Development Company In India

अंबव्वा महिला मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात, चाळीस सावित्रीच्या लेकींचा केला सन्मान !

अंबव्वा महिला मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात, चाळीस सावित्रीच्या लेकींचा केला सन्मान
—————————————–
जळकोट — तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील अंबव्वा महिला मंडळ जळकोट व महालक्ष्मी रेसकोर्स मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जळकोट येथील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या चाळीस सावित्रीच्या लेकींचा यथोचित सत्कार करण्यात आला
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंगणवाडी पर्यवेक्षिका इंदुमती राठोड या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून समता सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा प्रभावती मार्डीकर, पौर्णिमा महिला सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा बाबई चव्हाण, धाराशिव जिल्हा बालकल्याण समितीचे सदस्य दयानंद काळुंके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आशिष सोनटक्के, तेजस्वी संस्थेच्या अध्यक्षा नंदाताई पुनगुडे, मुख्याध्यापिका निता पाटील,सविताताई सोनटक्के,ग्रा पं सदस्य संजय अंगुले,संजय माने,सुरेखाताई माळगे, पत्रकार संजय रेणुके यांची प्रमुख उपस्थिती होती
यावेळी आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका,बचत गटातील प्रतिनीधी व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व उद्योजकता प्रशिक्षणातील चाळीस महिलांचा सन्मानपत्र , सन्मानचिन्ह,शाल फेटा देऊन सन्मान करण्यात आला
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंबव्वा महिला मंडळाच्या अध्यक्षा कस्तुरा कारभारी यांनी केले सुत्रसंचलन रेश्मा कारभारी यांनी तर आभार अंबिका कारभारी यांनी मानले
यासाठी रेवण कारभारी,किरण कारभारी, बलभीम कारभारी,आप्पाराव कारभारी, रत्नमाला औसेकर,सेबिया जमादार,ललीता पाटील,अनुसया औटे,सरोजीनी सुरवसे,लता कदमसह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला होता

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india