Best News Portal Development Company In India

तुळजापूर पोलिसांची अवैध मद्यविरोधी कारवाई ; दोन गुन्हे दाखल, दारूसाठा जप्त!

तुळजापूर पोलिसांची अवैध मद्यविरोधी कारवाई ; दोन गुन्हे दाखल, दारूसाठा जप्त!

लातूर रोड व जवळगा मेसाई शिवारात छापे हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त!

तुळजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध मद्य विक्रीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.

पहिल्या घटनेत, आरोपी शेषराव सोमनाथ दंडगुळे (वय 35 वर्षे, रा. उमरेगवहाण, ता. जि. धाराशिव) यास दिनांक 02 मार्च 2026 रोजी सकाळी 08:45 वाजण्याच्या सुमारास लातूर रोडवरील नवीन बसस्थानकासमोर अटक करण्यात आली. त्याच्याकडून अंदाजे ₹33,750 किंमतीच्या 15 देशी-विदेशी दारूच्या सिलबंद बाटल्या व एक मोटरसायकल जप्त करण्यात आली. हा साठा अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेला असल्याचे निष्पन्न झाले.

दुसऱ्या घटनेत, आरोपी श्रावण काशीनाथ गायकवाड (वय 55 वर्षे, रा. वेताळनगर, तुळजापूर, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) याला त्याच दिवशी सायंकाळी 07:10 वाजण्याच्या सुमारास जवळगा मेसाई शिवारातील शेत गट क्रमांक 406 मध्ये पकडण्यात आले. त्याच्याकडून अंदाजे ₹800 किंमतीच्या 16 देशी-विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.

या दोन्ही प्रकरणांमध्ये तुळजापूर पोलिसांनी अवैध मद्यसाठा जप्त करून संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम 65(ई) अन्वये तुळजापूर पोलीस ठाण्यात स्वतंत्र दोन गुन्हे नोंदविले आहेत.

तुळजापूर पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध मद्यविक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे बोलले जात आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india