Best News Portal Development Company In India

प्रभाकर सोनवणे यांचे दुःखद निधन ; अपसिंगा

प्रभाकर सोनवणे यांचे दुःखद निधन
————————————————–
नळदुर्ग (प्रतिनिधी ):
अपसिंगा तालुका तुळजापूर येथील फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते प्रभाकर किसन सोनवने यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी दि.४ मार्च २o२६ रोजी पहाटे ठिक ४.oo वा.दरम्यान अल्पशा अजराने दुःखद निधन झाले.
. दिवंगत प्रभाकर सोनवने हे एक अत्यंत प्रामाणिक व कष्ठाळू व्यक्तीमत्व होते. ते सहकार्याच्या भावनेतून प्रत्येकांच्या सुख दुःखात सहभागी होत असत.महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असो किंवा कोणताही सार्वजनिक कार्यक्रम असो प्रतेक कार्यक्रमात ते अवर्जून सहभागी व्हायचे.
त्यांच्या पश्चात पत्नी, तिन मुलं, एक मुलगी सुना जावाई नातवंडे असा मोठा परिवार आहे.अपसिंगा येथेच बौद्ध धम्म संस्कारानुसार त्यंच्या पार्थिव देहावर अंतिम संस्कार करण्यात आले.या प्रसंगी उपस्थित शोकाकूल जन समुदायानी त्याना भावपूर्ण श्रध्दांजली वाहीली.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india