पंचायत समिती तुळजापूरच्या सभापती पदी विक्रम देशमुख तर उपसभा पती पदी सौ.रोहिणी मिलगिरे यांची निवड
———————————————————
नळदुर्ग (एस. के.गायकवाड) :
धाराशिव जिल्ह्यातील पंचायत समिती तुळजापूरच्या सभापती पदी काटी येथील भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा नूतन पंचायत समिती सदस्य विक्रम देशमुख यांची तर उप सभापती पदी सिंदगाव तालुका तुळजापूर येथील नूतन पंचायत समिती सदस्या सौ. रोहीणी विवेकानंद मिलगिरे यांची निवड करण्यात आली आहे.
नुकतच पार पडलेल्या तुळजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाच्या सदस्य निवडीच्या निवडणुकीत तुळजापूर पंचायत समितीवर भाजपाला निर्विवाद बहुमत मिळाले होते परंतु पंचायत समिती सभापती आणि उपसभापती च्या निवडीची उत्सुकता तुळजापूर तालुक्यातील तमाम जनतेला लागली होती.ती उत्सुकता आता संपली असून दि. ६ मार्च २o२६ रोजी तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष लाडके आमदार राणाजगजीतसिंह पाटील उर्फ राणा दादा व तुळजापूर तालुक्याचे युवा नेतृत्व सुनील चव्हाण मालक यांच्या प्रमुख उपस्थितीत तुळजापूर पंचायत समिती सभापती आणि उपसभापती पदाची निवड प्रक्रिया पार पडली असून तुळजापूर पंचायत समिती सभापती पदी काटी पंचायत समिती गणातून विजयी झालेले भाजपाचे विक्रम देशमुख यांची निवड करण्यात आली असून पंचायत समिती नंदगाव गणातून विजयी झालेल्या सौ.रोहिणीताई विवेकानंद मिलगिरे यांची उप सभापती पदी निवड जाहीर करण्यात आलीआहे.
त्यांच्या या सार्थ निवडी बद्दल तुळजापूर तालुक्यातील भाजपा व मित्रपक्ष महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव साजरा केला असून नूतन सभापती व उपसभापती यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.






