Best News Portal Development Company In India

दिपाली वाघमारे बी.कॉम.तृतिय वर्षात आर. पी. कॉलेज धाराशिव मध्ये प्रथम : प्राचार्यांनी केले अभिनंदन !

दिपाली वाघमारे बी.कॉम.तृतिय वर्षात आर. पी. कॉलेज धाराशिव मध्ये प्रथम : प्राचार्यांनी केले अभिनंदन
—————————————————–
नळदुर्ग (एस.के.गायकवाड ):
वागदरी तालुका तुळजापूर येथील राजकुमार सोमा वाघमारे यांच्या कन्या कुमारी दिपाली राजकुमार वाघमारे यानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)च्या वतीने सन २o२४ – २५ या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या बी.कॉम. तृतीय वर्ष परीक्षेत रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव मध्ये महाविद्यालयातून प्रथम क्रमांक पटकाविला असून त्यांनी मिळवलेल्या यशा बद्दल कॉलेजचे प्राचार्य डॉ.संदिप देशमुख व परिक्षा प्रमुख प्रा.माधव उगीले यानी प्रशस्ती पत्रक व रामकृष्ण परमहंस गुणवत्ता शिष्यवृत्ती देऊन सत्कार करून अभिनंदन केल.
. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर संलग्नित रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव येथे सन २o२४-२o२५ या शैक्षणिक वर्षाती बि.काँम.तृतीय वर्गात शिकात असलेली दिपाली राजकुमार वाघमारे यानी मार्च-एप्रिल २०२५ मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर अंतर्गत घेण्यात आलेल्या बी.कॉम.पदवी परीक्षा दिली होती.
त्या परीक्षेचा निकाल नुकतच लागला असून बि.कॉम.तृतीय वर्षे या पदवी परिक्षेत कुमारी दिपाली वाघमारे यानी रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव मध्ये महाविद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल कॉलेजचे प्राचार्य डॉ. संदीप देशमुख, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, तसेच महाविद्यालय विकास समितीचे सन्माननीय सदस्य नानासाहेब पाटील, मराठवाडा सह विभाग प्रमुख प्राचार्य डॉक्ट जयसिंगराव देशमुख आदिच्या शुभहस्ते प्रशस्तीपत्र व राम कृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या वरिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापकाकडून महाविद्यालयात सर्व विषयांत प्रथम येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना रामकृष्ण परमहंस गुणवत्ता शिष्यवृत्ती दिली जाते त्या शिष्यवृत्तीचा धनादेश देऊन सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
कुमारी दिपाली वाघमारे यांनी मिळालेल्या यशाबद्दल रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वागदरी येथील ग्रामस्थ आदीनी अभिनंदन केले आहे.
.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india