जागतिक महिला दिनानिमित्त नळदुर्ग येथे कर्तुत्ववान महिलांचा पत्रकार संघाच्या वतीने सत्कार
—————————————————-
नळदुर्ग ( एस.के.गायकवाड):
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नळदुर्ग तालुका तुळजापूर येथील बसस्थानकात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात वाहक म्हणून सेवेत कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई तालुका शाखा तुळजापूर च्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला
. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई तालुका शाखा तुळजापूर चे सदस्य ज्येष्ठ पत्रकार इरफान काझी, भैरवनाथ कानडे,एस.के. गायकवाड.किशोर धुमाळ यांच्या पुढाकारातून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ तुळजापूर आगार अंतर्गत वाहक या पदावर सेवेत कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन नळदुर्ग येथील बस स्थानक येथे करण्यात आले होते.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ तुळजापूर आगारात वाहक म्हणून कर्तव्यावर असलेल्या वंदना किशोर धुमाळ,सुनीता अंगद जाधव व लक्ष्मी चंद्रकांत फुलारी आदी महिला कर्मचाऱ्यांचा पुष्पहार, शाल,पुष्प गुच्छ व मानाचा फेटा बांधून महिला प्रवासी तथा सहशिक्षिका मोहिनी झाकडे यांच्या शुभहस्ते यथोचित सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे भैरवनाथ कानडे यांनी केले तर सूत्रसंचलन एस.के.गायकवाड यांनी केले. या प्रसंगी रिपाइं (आठवले) चे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, सहशिक्षिका मोहिनी झाकडे यांचे शुभेच्छा पर भाषण झाले.
. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे किशोर धुमाळ, नळदुर्ग बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रक अनिल हांडे,राज्य परिवहन महामंडळात चालक म्हणून कार्यरत असलेले के.एस.घोडके, डी.जी.पवार,वाहक पी.व्ही.कुलकर्णी के.एन. कावळे,आर.डी.भोगे,एस.टी. कांबळे,शिवानंद बिराजदार, सामाजिक कार्यकर्ते जाधव सावकार,प्रमोद सोमवंशी, काशिनाथ सोमवंशी सह प्रवासी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






