Best News Portal Development Company In India

भवानी रोडवरील दुकान फोडून ५५ हजार रुपयांचा माल लंपास ; तुळजापूर शहरात चोरीची घटना!

भवानी रोडवरील दुकान फोडून ५५ हजार रुपयांचा माल लंपास ; तुळजापूर शहरात चोरीची घटना!
तुळजापूर प्रतिनिधी : शहरातील भवानी रोड परिसरात अज्ञात चोरट्यांनी दुकानातील माल चोरी करून नेल्याची घटना घडली असून याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा चोरीच्या घटनांना वेळीच आवर घालून आरोपीच्या मुस्क्या आवळाव्या अशी जनमानसात चर्चा आहे.
तुळजापूर पोलीस ठाणे : फिर्यादी रफीक इसाक सय्यद (वय 40 वर्षे, रा. विश्वासनगर हाडको, ता. तुळजापूर जि. धाराशिव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. 07 मार्च 2026 रोजी रात्रीच्या सुमारास माल पडद्याआड होता.दि. 08 मार्च 2026 रोजी पहाटे 05.00 वाजेपर्यंत या कालावधीत ही चोरीची घटना घडली.
भवानी रोडवरील वजे बिल्डिंग समोर तुळजापूर येथे असलेल्या दुकानाला पडदा झाकून ठेवलेला असताना अज्ञात व्यक्तीने दुकानातील हळद, कुंकू व साखर असा सुमारे 500 किलो माल चोरून नेला. चोरीला गेलेल्या मालाची एकूण किंमत अंदाजे 55,100 रुपये इतकी असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी रफीक इसाक सय्यद यांनी दि. 08 मार्च 2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 303(2) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून व्यापाऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.
सदर घटनेचा तपास तुळजापूर पोलीस करीत असून अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासह विविध अंगांनी तपास केला जात आहे. अशा भुरट्या चोरांचा शहरात सतत वावर असतो गर्दीचा फायदा घेऊन भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india