Best News Portal Development Company In India

वागदरी येथे ग्रामदैवत श्री संत भगवान सिंग महाराज यांची यात्रा मोठ्या उत्साहाने व विविध धार्मिक कार्यक्रमाणे संपन्न : नळदुर्ग नगराध्यक्षा सह हजारो भावी भक्तांनी घेतले दर्शन!

वागदरी येथे ग्रामदैवत श्री संत भगवान सिंग महाराज यांची यात्रा मोठ्या उत्साहाने व विविध धार्मिक कार्यक्रमाणे संपन्न : नळदुर्ग नगराध्यक्षा सह हजारो भावी भक्तांनी घेतले दर्शन
—————————————————
नळदुर्ग (एस.के.गायकवाड):
तुळजापूर तालुक्यातील मौजे वागदरी येथील ग्राम दैवत श्री संत भवन सिंग महाराज यांची यात्रा मोठ्या उत्साहात व विविध धार्मिक कार्यक्रमाने संपन्न झाली असून या प्रसंगी नळदुर्ग नगर परिषदेचे विद्यामान नगराध्यक्ष बसवराज आप्पा धरणे यांच्या सह परिसरातील हजारो भाविक भक्तांनी घेतले दर्शन.
. श्री संत भगवान सिंग महाराज यांच्या मुळे वागदरी गावाला गेल्या अनेक वर्षापासून वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेला असून श्री संत भगवान सिंग महाराज भजनी मंडळाच्या माध्यमातून आज तागायत हा वारकरी सांप्रदायाचा वारसा येथे जोपासला जातो.गावाच्या जवळूनच वहाणाच्या ओढ्याच्य काठावर निसर्गरम्य ठिकाणी श्री संत भवानसिंग महाराजांचे भव्य मंदिर आहे.या मंदिर परिसरात दरवर्षी होळी झाल्यानंतर सातव्या दिवशी एकनाथ सृष्टीला श्री संत भगवान सिंग महाराज यांची यात्रा भरवली जाते.
. प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी दि.१o मार्च २o२६ रोजी येथील ग्राम दैवत श्री संत भगवान सिंग महाराज यांची यात्रा संपन्न झाली.या यात्रे निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन श्री संत भगवान सिंग महाराज भजनी मंडळ व यात्रा कमिटी आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते.
दरवर्षा प्रमाणे याही वर्षी यात्रे निमित्ताने अक्कलकोट तालुक्यातील मौजे चुंगी येथून श्री संत भगवान सिंग महाराज यांची पालखी वारकरी दिंडीसह टाळ मृदंगाचा गजर करित वागदरीला दि.९ मार्च २o२६ रोजी सायंकाळी सात वाजता चुंगी येथील भाविक भक्त ग्रामस्थांनी घेऊन आले होते.गावातील मुख्य रस्त्यावरून पालखी आगमनाप्रित्यार्थ रस्त्याच्या दुतर्फा कडेला रांगोळी घालण्यात आली होती.अनेक ठिकाणी पालखीचे मनोभावे ग्रामस्थ भावीक भक्तांनी स्वागत केले.रात्रभर भजन किर्तन प्रवचन वगैरे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक १०मार्च रोजी दुपारी ठिक २.वा.दरम्यान लाही फोडून या यात्रेची सांगता करण्यात आली.या प्रसंगी नळदुर्ग नगर परिषदेचे विद्याम नगराध्यक्ष बसवराज धरणे, प्रथामक शिक्षक पतसंस्था तुळजाराचे चेअरमन प्रशांत मिरकर,सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवाजी वराडे गुरुगी सह परिसरातील नळदुर्ग, येडोळा,लोहगाव,गुजनूर,शहापूर,दहिटण,गुळहळी, निलेगाव,सह विविध ठिकाणाहून हजारोंच्या संख्येने भाविक भक्त उपस्थित राहून श्री संत भगवान सिंग महाराज यांचे मनोभावे दर्शन घेतले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail